उपासाचा फ्रूटी नट्टी पिझ्झा (upwasacha fruity nutty pizza recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#cpm6
#मॅगझीन week 6
उपासाचे पदार्थ पारंपरिक सोबतच आता नवीन जनरेशनला पिझ्झा बर्गर च्या रूपात मिळाली की ते जाम खुश होतात. असाच एक प्रयत्न गोड पिझ्झा बनवून त्याचा हेल्थी वर्जन तयार केला आहे. सर्वांना खूप आवडला.

उपासाचा फ्रूटी नट्टी पिझ्झा (upwasacha fruity nutty pizza recipe in marathi)

#cpm6
#मॅगझीन week 6
उपासाचे पदार्थ पारंपरिक सोबतच आता नवीन जनरेशनला पिझ्झा बर्गर च्या रूपात मिळाली की ते जाम खुश होतात. असाच एक प्रयत्न गोड पिझ्झा बनवून त्याचा हेल्थी वर्जन तयार केला आहे. सर्वांना खूप आवडला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 1/2 वाटीसाबुदाणा पीठ
  2. 1/2 वाटीआरारोट
  3. 1 वाटीदही
  4. 1/4 वाटीशिंगाडा पीठ
  5. 1नाशपत्ती
  6. 3स्लाइस अननस
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 1/2 वाटीसाखर
  9. 1 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे
  10. 2हिरव्या मिरच्या
  11. 1 टेबल स्पूनब्लू बेरीज
  12. 1 टेबल स्पूनड्रायफ्रूट पावडर
  13. 3भिजत घातलेल्या बदाम
  14. 1 टेबलस्पूनस्ट्रॉबेरी क्रश
  15. 1/2 टीस्पूनमिरपूड
  16. 2 टेबलस्पूनबटर
  17. 1/4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका वाटी मध्ये आरारुट साबुदाणा पीठ ड्राय फ्रूट पावडर व शिंगाडा पीठ एकत्र करून त्यात दही घालून तीन तास भिजत घाला.

  2. 2

    आता पीच च्या काही फोडी बारीक कापून घ्या. तसेच अननसाच्या फोडी थोड्या बारीक कापून घ्या. काही स्लाइस पीच व अननसाचा थोड्या मोठ्या राहू द्या. आता गॅसवर एका भांड्यामध्ये साखर विरघळून त्याचा कच्चा पाक करून घ्यावा. या फळांच्या फोडी टाका. खूप घट्ट नको होऊ देऊ थोडे पातळ होत असतानाच गॅस बंद करून ठेवा.

  3. 3

    आता भिजत घातलेले पीठ चमच्याने घोटून घ्या. यात थोडे मीठ घाला. आता गॅसवर पॅन ठेवा. त्यावर थोडे बटर टाका. आता यावर पळीने पिझ्झा चे बॅटर
    जाडसर पसरवा. त्यावर झाकण ठेवा व दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

  4. 4

    आता सर्व्हिंग प्लेटमध्ये हा पिझ्झा ठेवा. आता यावर स्ट्रॉबेरी क्रश पसरवा. यावर आपण साखरेत शिजवलेले पायनापल व पीच फोडी पसरवा. आता यावर डाळिंबाचे दाणे व ब्लूबेरी टाका
    कापलेली हिरवी मिरची घाला. सर्वात शेवटी मिरीपूड घाला आणि सर्व्ह करा उपसाचा फ्रु टी न टी पिझ्झा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

Similar Recipes