मिक्स डाळीचे वडे (mix daliche vada recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#cpm5

#Week5

#मिक्स_डाळीचे_वडे...😋😋

दक्षिण भारतातील इडली ,डोसा यांच्याबरोबरचा breakfast,snacks साठी अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे डाळवडा..हॉटेल्समध्ये मेन्यूकार्डवरचा हा हमखास पदार्थ,त्याचबरोबर चमचमीत डाळवडा हे Street food ही आहे..चणाडाळीपासून हा डाळवडा करतात..पण चणाडाळीबरोबरच तूरडाळ,मूगडाळ घालून पौष्टिक डाळवडा करतात...सर्वांच्याच आवडीचं हे fried food..❤️बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम डाळवडा चटणी,हिरव्या मिरचीबरोबर खाणं केवळ अवर्णनीय😍😍...धो धो पावसात काहीतरी चमचमीत खायची इच्छा हे मिश्र डाळीचे वडे नक्कीच पूर्ण करतात..चला तर मग ही इच्छापूर्तीची रेसिपी पाहू या..😍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनीटे
5-6 जणांना
  1. 1 कपचणाडाळ
  2. 1/4 कपमूगडाळ
  3. 1/4 कप तूरडाळ
  4. 2 टेबलस्पूनमटकी डाळ ऐच्छिक
  5. 8-10हिरव्या मिरच्या
  6. 2 इंचआलं
  7. 1 इंचआल्याचे बारीक तुकडे
  8. 10-12कडिपत्ता पाने
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथिंबीर
  11. 1मोठा कांदा बारीक चिरून
  12. 1 टीस्पूनजीरे
  13. 1 टीस्पूनजीरे
  14. 1/2 टीस्पूनहिंग
  15. 1/4 कपउडीदडाळ

कुकिंग सूचना

30-40 मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.नंतर एका पातेल्यामध्ये सर्व डाळी घेऊन स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यात पुरेसे पाणी घालून पाच ते सहा तास भिजत ठेवा. पाच ते सहा तासांनी ही डाळ एका चाळणी मध्ये अर्धा तास निथळत ठेवा.

  2. 2

    आता कांदा बारीक चिरून घ्या. त्याचप्रमाणे कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.मिरच्यांचे तुकडे करा आणि आल्याचे तुकडे करून घ्या.त्यानंतर निथळत ठेवलेल्या डाळीमधील एक वाटी डाळ बाजूला काढून ठेवा.आणि उरलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये हिरवी मिरची आणि आले घालून डाळ ऑन ऑफ ऑन ऑफ करत पल्स मोडवर सरबरीत दळून घ्या. आता यात बाजूला काढून ठेवलेली डाळ घालून व्यवस्थित मिक्स करा.

  3. 3

    नंतर कडीपत्ता. कोथिंबीर.हिंग, कांदा चवीपुरते मीठ थोडे जीरे घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि त्याचे हातांनी चपटे गोळे बनवून ठेवा.

  4. 4

    एकीकडे कढईमध्ये तेल तापत ठेवा आणि हे वडे मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर खमंग खरपूस तळून घ्या.

  5. 5

    तयार झाले आपले खमंग मिश्रडाळींचे वडे. एका प्लेटमध्ये खमंग खरपूस डाळ वडी चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes