रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulab jamun recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#cpm5
#Week5
#रताळ्याचे_गुलाबजाम...😋

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 🙏🌹🙏

आज देवशयनी आषाढी एकादशी 🙏🌿🌹🙏
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेली आजची एकादशी..,🙏पंढरीची वारी..माझे माहेर पंढरी. 🙏.ही वारकर्यांच्या आयुष्यातील अतिशय जिव्हाळ्याची ओढ....समचरण दृष्टी विटेवरी साजिरी...तेथे माझी वृत्ती हरि राहो...हेच मनात कायम भाव...हीच ओढ सगळ्यांना माऊलीकडे एखाद्या चुंबकासारखी खेचून नेते....विठू माझा लेकुरवाळा..🥰त्या माऊलीला पण आपल्या लेकरांची आस... युगानुयुगे विटेवर उभं राहून दोन्ही कर कटावरी ठेवून डोळ्यात प्राण आणून आपल्या लेकरांची चातकासारखी वाट पहात असते ही माऊली🙏.विठ्ठल' हे हिंदू धर्मातील वैष्णव पंथाचे, वारकरी संप्रदायाचे ,भागवत धर्माचे प्रमुख दैवत होय..आणि म्हणूनच मग या दिवशी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरीची वारी करत,भागवत धर्माची पताका घेऊन संतांचा,भक्तांचा,वैष्णवांचा मेळा पंढरीत जमतो.आणि माऊलीचे डोळे भरून दर्शन घेतो.. 🙏जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🌹🙏 डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात की, ‘विष्णु’ या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप ‘बिट्टि’ असे होते आणि या अपभ्रंशापासून ‘विठ्ठल’ हा शब्द बनला.’
१. विट ± ठल (स्थळ) · विठ्ठल
अर्थ : विटेवर उभा रहातो तो विठ्ठल.
२. विदा ज्ञानेन ठान् अज्ञजनान् लाति गृह्णाति ।
अर्थ : अज्ञ जनांना जो ज्ञानाने स्वीकारतो तो विठ्ठल.
३. ‘विठ्ठल’ याचे दुसरे नाव : पांडुरंग
‘पांडुरंग’ हे धवल शिवाचे नाव आहे. याचेच कानडीत पंडरंगे हे रूप होते; म्हणून पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते ‘पंढरपूर’ होय..चला तर मग आषाढी एकादशी निमित्त विठूराया साठी रताळ्याच्या गुलाबजामचा नैवेद्य करु या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60मिनीटे
4जणांना
  1. 3मध्यम उकडलेले रताळी
  2. 5 टीस्पूनशिंगाडा पीठ
  3. 3 टीस्पूनमिल्क पावडर
  4. 1 कपसाखर
  5. 1 कपपाणी
  6. वेलचीपूड
  7. 10-12केशर काड्या
  8. तळणीसाठी तेल किंवा साजूक तूप

कुकिंग सूचना

60मिनीटे
  1. 1

    प्रथम रताळ्याची साले काढून कुकरच्या भांड्यात अजिबात पाणी न घालता ठेवा आणि 3 शिट्ट्या करून उकडून घ्या.आपल्याला अगदी मऊ मेणासारखे रताळी उकडून घ्यायची नाहीत. हे रताळी पूर्ण गार झाली कि किसणीवर बारीक किसून घ्या.

  2. 2

    आता सगळे साहित्य एकत्र एके ठिकाणी ठेवा. आता एका परातीत व किसलेली रताळी घेऊन त्यामध्ये शिंगाडा पीठ आणि मिल्क पावडर एकत्र करून चांगला गोळा मळून घ्या. कोरडे वाटत असल्यास तुपाचा हात लावून परत एकदा मळून घ्या. आता हा गोळा 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा. एकीकडे पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून गुलाबजामसाठी पाक करून घ्या.आपल्याला साधारण पाणी आणि साखरेचे मिश्रण हाताला चिकट लागेल इतपर्यंत साखरेचा पाक शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये वेलची पावडर आणि केशर काड्या घालून पाक उकळून घ्या. नंतर गॅस बंद करा.

  3. 3

    एकीकडे कढईमध्ये तेल किंवा तूप घेऊन मंद आचेवर गरम करत ठेवा आणि वरील मिश्रणाचे गोळे करून घ्या. तेल किंवा तूप तापले की त्यामध्ये तयार केलेले गुलाबजामचे 4-4 गोळे घालून मंद आचेवर सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्या.गुलाबजाम तळताना गुलाबजाम वर झार्याने तूप अलगद उडवत रहा.(अनारसे तळताना करतो तसे) गुलाबजाम काळजीपूर्वक तळावेत..नाहीतर तर ते हसतात म्हणजेच पसरतात..त्यामुळे मंद आचेवर तळावेत..

  4. 4

    गुलाबजाम थोडे गार झाल्यावर कोमट पाकामध्ये घालून दोन ते तीन तास ठेवा.तयार झाले आपले खमंग रताळ्याचे गुलाबजाम..

  5. 5

    तयार झालेले गुलाबजाम एका बाउल मध्ये किंवा चांदीच्या वाटीत काढून घ्या.वरून पिस्त्याचे काप घालून सजवा.त्याचा देवाला नैवेद्य दाखवून सर्व्ह करा..

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes