उपवासाची पुरणपोळी (upwasachi puranpoli recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#cpm6 #week-6
#उपवास रेसिपी
ही माझी 351 वी रेसिपी आहे.
मी नंदिनी अभ्यंकर यांनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी करून बघितली.
उपवासाची पुरणपोळी ऐकताना वेगळे वाटले.मग करून बघायचे ठरवले. नवीन पदार्थ शिकायला मिळाला.मला दुकानात कुठेच केळाचे पीठ मिळाले नाही. दुकानदारांनी पण पहिल्यांदाच ऐकल्याचे सांगितले. त्यामुळे मी राजगिरा पीठ व शिंगाडा पीठ वापरले.
खूप छान झाली होती पुरणपोळी. तुम्ही नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
4 पुरणपोळी
  1. पुरणाचे साहित्य
  2. 1/2 कपउकडलेला बटाटा
  3. 1/2 कपउकडलेले रताळे
  4. 1/2 कपकिसलेला गूळ किंवा पावडर
  5. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1/4 टीस्पूनपेक्षा थोडी कमी जायफळ पावडर
  7. 4-5केशर काडया
  8. पारीसाठी साहित्य
  9. 1/2 कपराजगिरा पीठ किंवा केळाचे पीठ
  10. 2 टेबलस्पूनशिंगाडा पीठ
  11. चिमूटभरमीठ
  12. पाणी
  13. साजूक तूप लावण्यासाठी

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    गॅसवर कढई तापत ठेवून त्यात उकडलेले बटाटा व रताळयाचा किस घालून घेणे व 3-4 मिनिटे एकत्र करुन परतवून घेणे.गूळ घालून मिक्स करून घेणे.

  2. 2

    पुरण गोळा होईपर्यंत परतवून घेणे. थोडे घट्ट व्हायला लागले की, वेलची व जायफळ पावडर,केशर घालून घेणे.गोळा झाला की, गॅस बंद करावा. पुरण थंड होण्यासाठी ठेवावे.

  3. 3

    एका बाऊलमध्ये राजगिरा पीठ व शिंगाडा पीठ घेऊन, किंचितसे मीठ घालून, मिक्स करून घेणे. थोडे-थोडे पाणी घालून पीठ मळून घेणे.5-7 मिनिटे झाकून ठेवावे.

  4. 4

    गॅसवर तवा तापत ठेवावा. पिठ मळून त्याचे समान भाग करून घ्यावेत. एक गोळा घेऊन त्याची वाटी करून घेणे. पुरणाचा छोटासा गोळा घेऊन, त्यात घालून, तोंड बंद करून,उंडा करून घेणे. पोळपाटाला व लाटण्याला शिंगाडा पीठ किंवा राजगिरा पीठ लावून घेणे. पोळी अलगद लाटून घेणे.

  5. 5

    तव्यावर तेल/तूप सोडून घेणे. लाटलेली पोळी तव्यावर घालून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावी.

  6. 6

    अशाप्रकारे सर्व पोळया करून घेणे व साजूक तूप घालून खाणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes