जीरा राईस (jeera rice recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cpm6 जीरा राईस ही उत्तर भारतात आणि पाकिस्तान मध्ये रोजच्या आहारात समाविष्ट असलेली आणि आता सर्वत्र भारतात हमखास रेस्टॉरंट मध्ये मिळणारी प्रसिद्ध डिश आहे. 🍚

जीरा राईस (jeera rice recipe in marathi)

#cpm6 जीरा राईस ही उत्तर भारतात आणि पाकिस्तान मध्ये रोजच्या आहारात समाविष्ट असलेली आणि आता सर्वत्र भारतात हमखास रेस्टॉरंट मध्ये मिळणारी प्रसिद्ध डिश आहे. 🍚

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाऊण तास
४ व्यक्तींसाठी
  1. 2अडीच वाटी बासमती तांदूळ
  2. 9-10काजू
  3. 1तमालपत्र
  4. 1 इंचदालचिनी
  5. 8-9लवंगा
  6. 9-10काळीमिरी
  7. 1मसाला वेलची
  8. 1हिरवी वेलची
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. 1 मोठा चमचाजीरे
  11. 1 मोठा चमचाजीरे पावडर
  12. 1 चमचामीठ (किंवा चवीनुसार)
  13. 2मोठे चमचे तेल
  14. पाणी (तांदूळ शिजवण्यासाठी - आवश्यकतेनुसार)

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    २ - अडीच वाटी बासमती तांदूळ स्वछ धुवून १ तास पाण्यात ठेवला. मग पाणी काढून निथळत ठेवला. कुकर मध्ये २ मोठे चमचे तेल गरम करून त्यात १ मोठा चमचा जीरे, १ तमालपत्र, १ इंच दालचिनी, ८-९ लवंगा, ९-१० काळीमिरी, १ मसाला वेलची, १ हिरवी वेलची, २ हिरव्या मिरच्या यांची फोडणी दिली. एखाद मिनिट तेलावर परतल्यावर त्यात ९-१० काजू घालून काजू लालसर होईपर्यंत तळून घेतले.

  2. 2

    मग त्यात निथळलेला तांदूळ घालून तेलावर परतला. तांदूळ आणि मसाल्याच्या खमंग सुगंध पसरला कि त्यात १ मोठा चमचा जीरे पावडर आणि १ चमचा मीठ टाकून ढवळून घेतलं.

  3. 3

    सगळं व्यवस्थित मिक्स झालं कि त्यात नेहमी तांदूळ शिजवण्यासाठी जेवढं पाणी घालतो तेवढं ऍड करून कुकर ला ३ शिट्या काढल्या.
    कुकर थंड झाला कि जीरा राईस सर्व्ह करायचा. मस्त रेस्टॉरंट सारखा मोकळा आणि जिर्या सहित मसाल्यांचा सुगंध असलेला भात कोणत्याही ग्रेव्ही सोबत एक्दम चविष्ट लागतो.
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes