जीरा राईस (jeera rice recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#cpm6

एकंदरच "भात"प्रिय गटात मी मोडत असल्याने वरणभातापासून कोणताही भाताचा प्रकार अगदी मनापासून आवडतो...करायलाही आणि खायलाही!!
पूर्वी फक्त आंबेमोहोर किंवा कोलम तांदळाचा भात खाल्ला जायचा.पुलावाला दिल्ली राईस लागे.तोही फक्त दिवाळीत वगैरे आमच्याकडे आणला जायचा.नंतर सर्रास बासमतीचेच कणी,दुबार,तिबार,सबंध long grain असे प्रकार वापरले जाऊ लागले.मग आंबेमोहोर तर फक्त बाळंतीणीसाठी उरला.त्यानंतर आता राजभोग,कालीमूँछ,लचकारी,मसुरी,सोना मसुरी,वाडा कोलम,इंद्रायणी आणि उकडा तांदूळ ह्यातील सर्व प्रकार मी आलटून पालटून आणते.असा हा तांदूळ साठवणीचा आणि वैविध्यपूर्ण तांदूळ घरात संग्रही ठेवण्याचा माझ्या वडिलांचा गुण मी घेतलाय.मऊ भाताला इंद्रायणी मस्त.पीठीसाठी आंबेमोहोर छान.पुलाव बिर्याणी साठी जुना बासमती सबंध.इडलीला उकडा.धिरड्यासाठी मसुरी.लचकारी,राजभोग,दिल्लीराईस पुलाव,बिर्याणी साठी,लचकारी,बासमती तिबार जीराराईस साठी....इतक्या प्रकारचे वैविध्य तांदळात असल्याने तांदळाच्या बाबतीत मी खूपच चोखंदळ आहे.
सुवासिक आणि लांब पांढरा शुभ्र सळसळीत असा भात,त्यावर जिऱ्यांची मुक्त उधळण आणि मधूनच डोकावणारी कोथिंबीर हा एवढाच साज ल्यायलेला हा जीरा राईस नेहमीच घरचे किवा रेस्टॉरंट मधले जेवण पूर्ण करणारा...त्याबरोबर एखादा दाल तडका,दालफ्राय किंवा ग्रेव्हीवाली सब्ज़ी !
हॉटेलमध्ये तर हा जीरा राईस सर्व्ह करतात ते सर्व्ह करताना बघण्यातही गंमत वाटते.दोन टेबलस्पून मध्ये भरपूर भरुन एकदम ष्टाईलमध्ये सरसर वाढणाऱ्या वेटर्सचे कौतुक वाटते!👌फार काही तामझाम नसलेली तरीही आवडणारी ही रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
4 व्यक्ती
  1. 2 वाट्याजुना बासमती तांदूळ
  2. 3.5 वाट्यापाणी
  3. 3 टेबलस्पूनरिफाइंड तेल
  4. 1.5 टीस्पूनमीठ
  5. 2 टीस्पूनजीरे
  6. 1/2 वाटीकोथिंबीर

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा.व किमान अर्धातास भिजवून ठेवावा.तांदूळ जुना असल्याने पाणी थोडे जास्त लागते.तसेच तांदूळ भिजवल्याने चटकन शिजतो.

  2. 2

    साधारण अर्ध्या तासाने तांदळाचे पाणी निथळावे.गँसवरील कढईत पाणी उकळण्यास ठेवावे. पाण्याला भरपूर उकळी येऊ द्यावी.आता त्यात तांदूळ वैरावेत.(घालावेत).त्यावर आधण उतू जाणार नाही अशा बेताने झाकण ठेवावे.व भात पूर्ण मोकळा सळसळीत शिजवावा.10-12 मिनिटात भात शिजतो.

  3. 3

    भातातील वाफ मुरल्यावर भाताचे झाकण काढून मोठ्या ताटात भात काढून पूर्ण थंड होऊ द्यावा.

  4. 4

    एका कढईत तेल तापत ठेवावे.तेल तापल्यावर त्यात जीरे घालावेत.खूप करपायलाही नकोत.जरा ब्राउनी रंगाचे झाले की त्यावर मोकळा व थंड झालेला भात परतून घ्यावा.मीठ व कोथिंबीर घालून शिते तुटणार नाहीत अशा बेताने हलकेच दोन मिनिटे परतावे.
    जीराराईस तयार आहे.दालफ्राय किंवा ग्रेव्हीबरोबर गरमागरम सर्व्ह करावा जीरा राईस!😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes