उपवासाची कोथिंबीर वडी (upwasachi kothimbir wadi recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#cpm6
#week6
#उपवासाची_रेसिपी
उपवासाला जीरे आणी कोथिंबीर खात असाल तर ही रेसिपी नक्की करून बघा.

उपवासाची कोथिंबीर वडी (upwasachi kothimbir wadi recipe in marathi)

#cpm6
#week6
#उपवासाची_रेसिपी
उपवासाला जीरे आणी कोथिंबीर खात असाल तर ही रेसिपी नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचेचाळीस मिनिट
3_4 सर्व्हिंग
  1. 1 कपभगरीचे पीठ (भगर धूवून वाळवून भाजून पीठ करून घेतले)
  2. 1 टेबलस्पूनसाबुदाणा पीठ (भाजून पीठ)
  3. 3 टेबलस्पूनराजगीरा पीठ (भाजून पीठ)
  4. 1आले
  5. 1 कपकोथिंबीर बारीक चिरून
  6. 1 टीस्पून जीरे
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टेबल स्पूनखोबरा कीस गार्णिशींग साठी
  10. 2-3 हीरव्या मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा
  11. तूप किंवा शेंगदाणा तेल शॅलो फ्राय करण्यासाठी मी तेल वापरले आहे

कुकिंग सूचना

पंचेचाळीस मिनिट
  1. 1

    कोथिंबीर दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या. पाणी तूटू द्या. नंतर बारीक चीरून घ्या. सगळे साहित्य जमा करून घ्या.

  2. 2

    आता भगरीचे पीठ,राजगिरा पीठ,साबुदाणा पीठ एकत्र करून घ्या. त्यात तिखट,मीठ,आले व मिरची व जीरे भरड घालून घ्या.

  3. 3

    आता त्यात पाणी घालून आसट पीठ भिजवून घ्यावे. थालीपीठाला भिजवतो तसेच भिजवून घ्यावे.

  4. 4

    स्टीमर मध्ये पाणी घालून झाकण लावून पाच मिनिट आधी गरम करून घ्या. एका प्लेटला तेल लावून त्यात पीठ पसरून घ्या व स्टिमरमध्ये पंधरा मिनिट वाफवून घ्या.

  5. 5

    स्टीमर नार्मल टेंप्रेचरला आले की प्लेट काढून घ्या सूरीने वड्या कट करून घ्या. पॅन मध्ये तेल घालून गरम करा.

  6. 6

    आता लो मिडीयम फ्लेमवर वड्या शॅलो फ्राय करून घ्या.खोबरा कीस स्प्रेड करून दह्याची चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या (7)

Jayshree Jadhav Patil
Jayshree Jadhav Patil @Jaya_2305
Tai mala na talta khamang kothmbir ani aluwadi recipies dyal ka pls

Similar Recipes