मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#cpm1

#Week1

#मॅंगो_कस्टर्ड...😋😋

( कोविड झाल्यामुळे ही रेसिपी पोस्ट करायची राहून गेली होती.)

फळांचा राजा आंबा.. आंब्यापासून तयार होणारी अजून एक अप्रतिम चवीचे आणि सर्वांनाच आवडणारे डेझर्ट ..मॅंगो कस्टर्ड..😍😋पूर्वी अशी डेझर्ट हाॅटेलमध्ये खाताना खूप अप्रूप वाटायचं..असं वाटायचं किती स्वर्गीय चवीचे आहेत हे पदार्थ..आणि सजावट पण अफलातून आहे.. खूप कठीण असतील यांच्या रेसिपीज.. खूप कौतुक आणि समाधान वाटायचे..पण प्रत्यक्षात एकेक रेसिपी करु लागले तेव्हां वाटायचे किती सोप्प्या आहेत या रेसिपीज.. perfect चव जमायला लागली..आणि presentation हळूहळू शिकत आहे.. त्यामुळे आपण हे सगळे पदार्थ घरी करुन बघू शकतो हा आनंदच अवर्णनीय!!!!!!😍😍
चला तर मग रेसिपी कडे जाऊ या...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25मिनीटे
4जणांना
  1. 1/2 लिटरदूध
  2. 1 टेबलस्पूनकप साखर
  3. 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर
  4. 1/2 कपदूध
  5. 1/2 कपआमरस (यात साखर घालून फ्रीजमध्ये करुन ठेवलेला आहे)
  6. बदाम पिस्ते काप
  7. टुटीफ्रुटी

कुकिंग सूचना

20-25मिनीटे
  1. 1

    एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवा आणि त्यात साखर घालून मिक्स करा.

  2. 2

    आता अर्धा कप दूधात कस्टर्ड व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  3. 3

    दूधाला उकळी आली की त्यात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ओतून व्हिस्करने गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित मिक्स करा.

  4. 4

    नंतर त्यात बदाम,पिस्त्याचे काप घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. घट्ट झाल्यावर मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्या.

  5. 5

    गार झाल्यावर आंब्याचा रस घालून छान मिक्स करून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवा.. गार करा.

  6. 6

    तयार मॅंगो कस्टर्ड ग्लासेस मध्ये ओतून वरुन टुटीफ्रुटी बदाम पिस्ता काप घालून गारेगार सर्व्ह करा..

  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes