झटपट शेवई खीर (seviya kheer recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#gpr
#गुरूपौर्णिमा स्पेशल रेसिपी

"झटपट शेवई खीर"

" गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गुरू देवो महेश्वरा, गुरू साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नमः

गुरु विन भाव... गुरु विन देव..कोण अशी.. आपल्या मनातील भाव,सुख, दुःख समजणारा, आपल्याला मायेची सावली देणारा,आपली काळजी वाहणारा, वेळोवेळी मार्गदर्शन करणारा, शिकवण,समज देणारा असा आपला गुरु असतो...
मी तर म्हणेन आपण या जिवनात नेहमीच शिष्य आहोत,कोणी ना कोणी आपला गुरु शेवटपर्यंत असतोच म्हणजे आपण शेवटपर्यंत शिकत असतो..जसे की बालवयात आई वडील, आजी आजोबा, आत्या, मावशी असे सगळेच गुरू असतात,ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात..पण असं काही नाही की आपण आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांना च गुरू मानले पाहिजे.. आपल्या पेक्षा लहान सुद्धा आपल्याला कधी कधी योग्य सल्ला देतात, शिकवतात.... म्हणून मी सगळ्या लहान थोरांना माझे गुरू मानते.. आपल्या या कुकपॅड ग्रुपमध्ये अनेक नवनवीन पदार्थांची रेसिपीजची ओळख तुम्ही करून देता, तुम्ही सुद्धा माझे गुरू आहात.. आज मी ही रेसिपी माझी आई, मावशी या गुरुंना समर्पित करायची आहे.. पुर्वी आई, मावशी शेवया बनवण्याचा लाकडी पाटावर दरवर्षी उन्हाळ्यात शेवया बनवायची.. खुप सुंदर असायच्या त्या शेवया, हल्ली तर बघायला ही मिळत नाही..गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी तशी गत झाली आहे..
तर ही रेसिपी मी माझ्या आई व मावशीला माझ्या हातची पहिल्यांदा खाऊ घातली होती.. खुप आवडली होती दोघींनाही..आज या जगात नाहीत,पण गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने ही रेसिपी बनवुन त्यांची आठवण आणि खीर खाऊन त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझ्या स्वैयंपाकाच्या आवडीचे कौतुक आणि पाठीवर मायेने फिरलेल्या हातांचे शतशः आभार मानते...🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन
  1. 1/4 कपबारीक शेवई
  2. 1/2 लिटरदूध
  3. 1/4 कपसाखर
  4. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  5. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स.
  6. 4काजू
  7. 5बदाम
  8. 5-6 मनुके
  9. 4 पिस्ता असे घेतले आहे
  10. 4-5 केशर काड्या

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    ड्रायफ्रुट्स कापून घ्या..दुध तापत ठेवा..

  2. 2

    कढईत तूप घालून गरम झाले की गॅस बारीक करुन त्यात ड्रायफ्रुट्स तळून घ्या.. प्लेटमध्ये काढून घ्या.. राहिलेल्या तुपात शेवया भाजून घ्या..

  3. 3

    दुधामध्ये साखर, केशर घालून मिक्स करा. वेलचीपूड घाला.शेवया छान खरपूस भाजून झाल्यावर तुपा सकट तशाच दुधामध्ये घाला..ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.पाच मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्या..

  4. 4
  5. 5

    तय्यार गरमागरम शेवई खीर वाटी मध्ये काढून सर्व्ह करा.. थंड झाल्यावर ही छान च लागते..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes