मटार पनीर (matar paneer recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

पनीर हे डायेटसाठी वापर होतो... त्याचे अनेक प्रकार आहेत... त्या तलाच एक प्रकार म्हणजे ( मटार पनीर ) ही रेसीपी करणार आहोत ...

मटार पनीर (matar paneer recipe in marathi)

पनीर हे डायेटसाठी वापर होतो... त्याचे अनेक प्रकार आहेत... त्या तलाच एक प्रकार म्हणजे ( मटार पनीर ) ही रेसीपी करणार आहोत ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
4 सर्व्हिंग्ज
  1. २५० ग्रॅम फ्रेश पनीर
  2. 1 कपफ्रेश मटार
  3. 2मोठे कांदे
  4. मोठे टॕमेटो
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1 टेबलस्पून पनीर मसाला
  7. 1 टेबलस्पूनऐव्हरेस्टचा तिखालाल मसाला
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनधने+ जीर ची पूड
  10. मीठ
  11. तेल
  12. तूप
  13. कस्तुरी मेथी
  14. लहसुण

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम पॕनमध्ये तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात उभा कापलेला कांदा घालून तो चांगला परतून त्यात टॕमेटो घालून त्या वर ५ मिनिटे झाकण ठेवून द्यावे... नंतर त्यात २ हिरव्या मिरच्या उभ्या घालून परतून ते मिश्रण मऊ होईपर्यंत त्या वर झाकण ठेवावेत...

  2. 2

    ते मिश्रण मऊ होण्यासाठी त्यात थोडे मीठ घालावे....नं तर ते मिश्रण थंड होऊ द्यावेत. नंतर ते मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालावे..

  3. 3

    नंतर त्यात १ चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल घालावा आणि १ चमचा kichan king पनीर मसाला घालून ते वाटूण त्याची बारीक पेस्ट करावी.

  4. 4

    आता त्याच पॕनमध्ये ४ चमचे तेल गरम करून त्यात १ चमचा जीरे आणि २ चमचे ठेचलेला बारीक लहसुण घाला...ते आता चांगले परतून घ्या...

  5. 5

    आता त्यात तयार केलेल वाटण घालून त्यात १ चमचा धने पूड आणि १ चमचा जीरे पूड आणि........

  6. 6

    त्यात अर्धा चमचा हळद आणि १ चमचा एव्हरेस्टचा तिखालाल घालून त्यात १ कप स्वच्छ धुऊन घेतलेले मटार त्यात घालून त्या वर झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे वाफेस ठेवून द्यावे..

  7. 7

    नंतर ५ ते ७ मिनिटांनी झाकण काढून ते मिश्रण परत एकदा ढवळून घ्यावे....आणि परत झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे वाफेस ठेवावे. आता झाकण काढून त्यात दुधपावडरची पेस्ट घालून त्यात पनीर चे तुकडे घालून ते मिश्रण परत ढवळून त्यात २ चमचे तूप घालून त्यात अर्धा कप पाणी घालून १५ मिनिटे छान शिजवून द्यावेत...

  8. 8

    आता १५ मिनिटांनी झाकण काढून ते परत ढवळून घ्यावे. आता त्यात मीठ आणि परत एकदा kichan king पनीर मसाला १ चमचा आणि थोडी कस्तुरी मेथी घालून त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे आणखी शिजू द्यावी..

  9. 9

    तर ह्या ठिकाणी तयार आहे..(मटार पनीर) आता सजावट करण्यासाठी चीज किसुन घाला किंवा कोथींबीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes