मटार पनीर (matar paneer recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

मटर पनीर एक शाकाहारी उत्तर भारतीय डिश आहे आणि टोमॅटोवर आधारित ग्रेव्हीमध्ये मटार, पनीर आणि गरम मसाले असलेली मसालेदार पंजाबी डिश आहे. हे सहसा नान, पराठा किंवा रोटी बरोबर खाल्ले जाते.
पनीर हे घरात सगळ्यानाच आवडत असल्यामुळे आज मटार पनीरचा घाट घातला. पण घरी मात्र पोळीबरोबरच छान लागते.

मटार पनीर (matar paneer recipe in marathi)

मटर पनीर एक शाकाहारी उत्तर भारतीय डिश आहे आणि टोमॅटोवर आधारित ग्रेव्हीमध्ये मटार, पनीर आणि गरम मसाले असलेली मसालेदार पंजाबी डिश आहे. हे सहसा नान, पराठा किंवा रोटी बरोबर खाल्ले जाते.
पनीर हे घरात सगळ्यानाच आवडत असल्यामुळे आज मटार पनीरचा घाट घातला. पण घरी मात्र पोळीबरोबरच छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ सर्व्हिंगज
  1. ग्रेव्हीसाठी
  2. 3उभे चिरलेले कांदे
  3. 3टोमॅटो
  4. 2 टीस्पूनचिरलेले लसूण
  5. 1 टीस्पूनचिरलेलं आलं
  6. 4 टीस्पूनतेल
  7. 1दालचिनीचा छोटा तुकडा
  8. 4वेलदोडे
  9. 1तमालपत्र
  10. 3लवंगा
  11. 3काळी मिरीचे दाणे
  12. चवीनुसार मीठ
  13. भाजीसाठी
  14. ५०० ग्रॅम उकडलेले मटार
  15. १५० ग्रॅम पनीर
  16. 1 छोटाकांदा
  17. 2 टीस्पूनधने जीरे पावडर
  18. 3 टीस्पूनलाल तिखट
  19. 1 टीस्पूनगरम मसाला
  20. 1 टीस्पूनहळद
  21. आवश्यकतेनुसार पाणी
  22. 1 टीस्पूनअमूल बटर
  23. 3 टीस्पूनतेल
  24. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम ग्रेव्हीसाठी एका कढईत तेल घेऊन त्यात दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरे आणि जिरं घालून परतून घ्यावं. मग त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा परतून झाल्यावर त्यात लसूण आणि आलं घालून मिक्स करुन परतावं. मग त्यात मीठ आणि टोमॅटो घालून मिक्स करुन १५ मिनीटं झाकण ठेऊन शिजवावे.

  2. 2

    शिजलेले कांदा टोमॅटोचे मिश्रण गार करुन मिक्सरमधे वाटून घ्यावे.

  3. 3

    आता एका कढईत तेल आणि बटर घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनेजिरे पूड घालून छान परतून घ्यावे. मग त्यात तयार ग्रेव्ही घालून एकत्र करावे. तेल सुटेपर्यंत परतावे.

  4. 4

    आता त्या मिश्रणात कांदा, मटार, मीठ आणि पाणी घालून सर्व व्यवस्थित ढवळून घ्यावे. आता त्यात पनीरचे तुकडे घालून सर्व मसाला पनीरला लावून घ्यावा. सर्व नीट एकत्र झाल्यावर खायला तयार मटार पनीर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes