मटण खीमा टोस्ट सॅडविच (mutton kheema toast sandwich recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#wdr
#आज weekend ला काय करावं हा ? होता .खीमा आज आला मग काय डिश तयार .

मटण खीमा टोस्ट सॅडविच (mutton kheema toast sandwich recipe in marathi)

#wdr
#आज weekend ला काय करावं हा ? होता .खीमा आज आला मग काय डिश तयार .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅममटणखीमा
  2. 1/2 कपकांदा
  3. 1 टेबलस्पूनआललसुण मिरची पेस्ट
  4. 1 टेबलस्पूनमिक्स मसाला(मी घरचा घातलाय)
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. ब्रेड स्लाईस
  8. 2 टेबलस्पूनबटर
  9. टिप..मिक्स मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट नि गरम मसाला घाला

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    खीमा धुवून निथळत ठेवणे.कांदा चिरून घेणे.आललसुण मिरची वाटण नसेल तर करून घेणे.

  2. 2

    कढईत तेल गरम करत ठेवावे गरम झाले कि त्यात कांदा घाला परतून घ्या. नंतर मसाले घाला परता, वाटण घाला परता नंतर खीमा घाला नी 5मिनिटे परतून घ्या.बेताचे पाणी घालून कुकरमधे 3/4शिट्या घेऊन शिजवा.

  3. 3

    कुकर उघडला नी थोडे पाणी राहिले असेल खीमा खालीलप्रमाणे कोरडा करून घ्या.नी तो थोडावेळ थाळीत तिरका ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.

  4. 4

    ब्रेड स्लाईसना एका बाजूला थोडे बटर लावून घ्या.बटर ची बाजू खाली ठेऊन त्यावर खिमा पसरवावा नी वरती परत एक स्लाईस ठेवा बटर लावलेली बाजू वर ठेवा.

  5. 5

    आता हे सॅडविच स्टोस्ट सॅडविच मेकरची मधे ठेवा नी टोस्ट करून घ्या.

  6. 6

    मटण खीमा टोस्ट सॅडविच तयार आहे मस्त साॅस बरोबर खायला खुपच छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes