ओरिओ रोल डिलाईट (oreo roll delight recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#wdr
#विकएंड_रेसिपी_चॅलेंज
"ओरिओ रोल डिलाईट"
ही रेसिपी एक मिठाई चाच प्रकार बनतो.. आणि विशेष म्हणजे गॅस ची गरज नाही.. फक्त खसखस गरम करून घ्यायची आहे.. स्वस्त आणि मस्त अशी..
ही रेसिपी मी कालच बनवली आहे ‌.म्हटल Friendship day पण आहे आणि विकएंड रेसिपी चॅलेंज तर काहीतरी नवीन ट्राय करुया..तर ही गोड गोड रेसिपी माझ्या सगळ्या सुगरण मैत्रिणींसाठी ❤️❤️❤️

ओरिओ रोल डिलाईट (oreo roll delight recipe in marathi)

#wdr
#विकएंड_रेसिपी_चॅलेंज
"ओरिओ रोल डिलाईट"
ही रेसिपी एक मिठाई चाच प्रकार बनतो.. आणि विशेष म्हणजे गॅस ची गरज नाही.. फक्त खसखस गरम करून घ्यायची आहे.. स्वस्त आणि मस्त अशी..
ही रेसिपी मी कालच बनवली आहे ‌.म्हटल Friendship day पण आहे आणि विकएंड रेसिपी चॅलेंज तर काहीतरी नवीन ट्राय करुया..तर ही गोड गोड रेसिपी माझ्या सगळ्या सुगरण मैत्रिणींसाठी ❤️❤️❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दहा बारा
  1. 4पाकिट ओरिओ बिस्कीट (120ग्रॅ.चे)
  2. 2 टेबलस्पूनकाजू चे तुकडे
  3. 2 टेबलस्पूनबदामाचे तुकडे
  4. 2 टेबलस्पूनपिस्त्याचे तुकडे
  5. 2 टेबलस्पूनदुधाची साय
  6. 5-6 टेबलस्पूनदुध
  7. चिमुटभरकेशरी रंग
  8. 7-8केशराचे तुकडे
  9. 1 टेबलस्पूनखसखस
  10. बटर पेपर किंवा फाॅईल पेपर
  11. 1/2 कपडेसिकेटेड कोकोनट

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    बिस्किटे एका ताटात काढून घ्या.. त्यातील क्रीम काढून वेगळ्या वाटी मध्ये काढून घ्या.

  2. 2

    बिस्किटांचे तुकडे करून घ्या व मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या..

  3. 3

    एक टेबलस्पून कोमट दुधामध्ये केशर भिजत ठेवा.. बाकीचे साहित्य एकत्र जमवून घ्या.. खसखस थोडीशी गरम करून घ्या..

  4. 4

    क्रीम मध्ये काजू बदाम पिस्त्याचे तुकडे,डेसिकेटेड कोकोनट, चिमुटभर केशरी रंग, केशर भिजवलेले दुध घालून मिक्स करा व घट्ट गोळा मळून घ्या..

  5. 5

    क्रीमचा गोळा बाजूला ठेवा व दुध आणि साय एकत्र करून गाळणीने गाळून घ्या..व बिस्किटांच्या चुऱ्यामध्ये थोडे थोडे घालत त्याचा घट्ट गोळा मळून घ्या..

  6. 6

    क्रीम चा गोळा हाताने मऊ करून त्याचा लांबट रोल करून घ्या व बिस्किटांचा गोळा फाॅईल पेपर वर ठेवून हाताने प्रेस करत पुरीच्या आकारा एवढा करून घ्या.

  7. 7

    त्यावर दुसरा फाॅईल पेपर ठेवून चपाती च्या आकारात लाटून घ्या.. आता वरचा पेपर काढून घ्या व त्यावर क्रीमचा रोल ठेवून गोल गोल फिरवत व हाताने प्रेस करत गुंडाळून घ्या..व फाॅईल पेपरमध्ये गुंडाळून दोन्ही बाजूंनी बंद करून दोन तीन तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा..

  8. 8

    चाॅपिंग बोर्ड वर पेपर ठेवून त्यावर खसखस भुरभुरावी व त्यावर रोल फिरवून घ्या.. खसखस दिसायला ही छान दिसते आणि चवही छान येते..व हव्या त्या आकारात कापून घ्या..

  9. 9

    प्लेटमध्ये सजवून सर्व्ह करा.. खुप छान मिठाई चा प्रकार बनतो.. स्वस्त आणि मस्त.. शिवाय गॅस ची गरज नाही..नो फायर...

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या (6)

Manasi Dodke
Manasi Dodke @cook_31111502
Khup chan Mawshi swastat mast ani apan swatahun kel te welglech samadan 👌🏻👍

Similar Recipes