मटर पनीर (matar paneer recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#EB1 #W2
मटरपनीर ही एकदम पॉप्युलर डीश...सगळ्यांची खूप आवडती.सहज आणि पटकन होणारी.पनीर आपल्याकडे आता एक हेल्दी डाएट फूड म्हणून वापरले जाते.दुधापासून तयार होणारं हे पनीर कॉटेज चीज म्हणूनही ओळखलं जातं.रोटी,नान,फुलका,पराठा याबरोबर पनीरची कोणतीही डीश लज़िज लागते.चला तर...थंडीसाठी स्वादिष्ट ग्रेव्हीवाली सब्जीका आनंद लेते है।😊😋

मटर पनीर (matar paneer recipe in marathi)

#EB1 #W2
मटरपनीर ही एकदम पॉप्युलर डीश...सगळ्यांची खूप आवडती.सहज आणि पटकन होणारी.पनीर आपल्याकडे आता एक हेल्दी डाएट फूड म्हणून वापरले जाते.दुधापासून तयार होणारं हे पनीर कॉटेज चीज म्हणूनही ओळखलं जातं.रोटी,नान,फुलका,पराठा याबरोबर पनीरची कोणतीही डीश लज़िज लागते.चला तर...थंडीसाठी स्वादिष्ट ग्रेव्हीवाली सब्जीका आनंद लेते है।😊😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मि.
5व्यक्ती
  1. मटर पनीर साहित्य
  2. 5-6टोमॅटो
  3. 2-3कांदे
  4. 1/2 किलोपनीर
  5. 1/4 किलोफ्रोझन मटार/ताजे मटार दाणे
  6. 5-6दालचिनी तुकडे
  7. 1जायपत्री
  8. 2हिरव्या मिरच्या
  9. 1/2 इंचआले
  10. 8-10लसुणपाकळ्या
  11. 2 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनधणेजीरे पूड
  13. 1 टीस्पूनलाल तिखट
  14. 2 टीस्पूनमीठ/चवीनुसार
  15. 250 मि.लीफ्रेश क्रीम
  16. 3 टेबलस्पूनरिफाइंड तेल
  17. 2 टीस्पूनबटर
  18. 1 टीस्पूनकसुरीमेथी

कुकिंग सूचना

40मि.
  1. 1

    वरील प्रमाणे मटरपनीरसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची पूर्वतयारी करुन ठेवावी.कांदा,टोमॅटो चिरुन घ्यावा.आलं,लसूण, मिरची यांची पेस्ट करावी.कढईत आता तेल तापत ठेवावे.तेल तापल्यावर त्यात 2टेबलस्पून बटर घालावे.चव छान येते.व दाटपणा येतो.

  2. 2

    यावर आता कांदा मऊ होईपर्यंत परतावा.कांदा शिजून मऊ झाला की त्यावर चिरलेले टोमॅटो घालून परतावे.व मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवावे.

  3. 3

    कढईत तेल घालावे.त्यावर मटार घालून परतावे.परतताना थोडे मीठ घालावे. व थोडे शिजवून ताटलीत काढून ठेवावे.मी फ्रोझन मटार वापरले आहेत.मिक्सरमधून कांदा-टोमॅटो प्युरी करुन घ्यावी.

  4. 4

    मिक्सरमधील वाटणामध्येच फ्रेश क्रीम घालावे व मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करावे.कढईत पुन्हा तेल व बटर गरम करुन घ्यावे.त्यात जायपत्री,दालचिनी तुकडे तळून घ्यावेत.

  5. 5

    त्यावर कांदा टोमॅटो पेस्ट घालावी.ग्रेव्ही किती पातळ हवी आहे हे अंदाजे ठरवावे. त्यावर लाल तिखट,धणे जीरे पूड,गरम मसाला व चवीनुसार मीठ घालावे.सर्व मसाले हलवून त्यावर परतलेले मटार घालावेत.

  6. 6

    त्यावर चिरलेले चौकोनी आकाराचे मऊ असे पनीर घालावे.छान उकळी येऊ द्यावी.गँस बंद करावा.यावर कसुरी मेथी क्रश करुन घालावी...व सर्व्ह करावे मटरपनीर!!👍😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes