कवळ्याच्या भाजीची आमटी (kavlyachya bhajichi amti recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#कवळ्याचीआमटी
#कवळाभाजी
#रानभाजी

#श्रावणसोमवारस्पेशलभाजी
श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी
आज श्रावण सोमवार निमित्त खाल्ली जाणारी कवळ्याची भाजी कशाप्रकारे तयार करायची रेसिपी तू नक्कीच बघा दाजी श्रावण महिन्यात बाजारात आपल्याला मिळायला सुरुवात होते याचे महत्त्व श्रावणी सोमवारी खाण्याचे विशेष असे आहे
कवळ्याची भाजी ची आमटी रेसिपी मी आज इथे घेऊन आली आहे ती श्रावण सोमवारच्या दिवशी खाल्ली जाते हि रान भाजी पावसाळ्यात डोंगराळ, पठार, मैदानावर उगायला लागते अतिशय स्वादिष्ट आणि गुणकारी अशी ही भाजी आहे दिसायला हि लाजाळूच्या वेल सारखी दिसते पन चवीला वेगळी असते
ही भाजी ची आमटी तयार करून भाताबरोबर छान लागते बरेच लोक श्रावण सोमवारच्या दिवशी भाजी तयार करून जेवणातून घेतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25  मिनिट
3 व्यक्ति
  1. 1जोडी कवळा भाजी
  2. 1 छोटागोळा चिंचेचा
  3. 1/2 टेबल्स्पूनतेल
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1/4 टीस्पूनआले किसलेले
  6. 2/3लसून पाकळ्या
  7. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  8. 1/2 टेबलस्पूनधना पावडर
  9. 1 टीस्पूनहळदी पावडर
  10. 1/2 टेबल्स्पूनगरम मसाला
  11. चवीनुसारमीठ
  12. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

25  मिनिट
  1. 1

    कवळा भाजी दिसायला कशी दिसते ती फोटोतून दाखवली आहे

  2. 2

    आणलेली भाजी बाजारातून आणून तिचे साईडचे पाने कोवळी कोवळी पाने तोडून काडया वेगळ्या करून घ्यायच्या

  3. 3

    वेगळी केलेली पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे
    चाकूने बारीक कट करून घ्यायची भाजी

  4. 4

    एका पातेल्यात 5/10 मिनिट चिंच भिजवून घ्यायची

  5. 5

    चिंच पाण्यात व्यवस्थित चोळून पाणी गाळून घ्यायचे

  6. 6

    आता त्या चिंचेच्या पाण्यात बारीक चिरलेली कवळ्याची भाजी टाकून द्यायची दिल्याप्रमाणे मसाले,मीठ टाकून द्यायचे गरजेनुसार अजून थोडे पाणी टाकायचे

  7. 7

    बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण,आले किसून टाकून द्यायचे आणि पातेले गॅसवर उकळायला ठेवायचे

  8. 8

    भाजी उकळून उकळून आटुन घ्यायचे भाजी शिजल्यानंतर अर्धवट झाल्यावर गॅस बंद करून द्यायचा

  9. 9

    तयार कवळ्याची भाजी ची आमटी गरम भाताबरोबर सर्व्ह करायचे

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes