पुड पोहे (pohe recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#ngnr पोह्याचे करण्याचे बरेच प्रकार आहेत पण कांदा लसुन न घालता व झटपट होणारा प्रकार म्हणजे पुड पोहे हा प्रकार मी स्वत: करुन पाहीला व खुप छान झाला व पोह्यांची जाडसर पावडर करुन केल्या मुळे पुड पोहे हे नांव दिले. सॅलेड व भाज्या आहेत त्या मुळे हेल्दी ही आहे.

पुड पोहे (pohe recipe in marathi)

#ngnr पोह्याचे करण्याचे बरेच प्रकार आहेत पण कांदा लसुन न घालता व झटपट होणारा प्रकार म्हणजे पुड पोहे हा प्रकार मी स्वत: करुन पाहीला व खुप छान झाला व पोह्यांची जाडसर पावडर करुन केल्या मुळे पुड पोहे हे नांव दिले. सॅलेड व भाज्या आहेत त्या मुळे हेल्दी ही आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 1 कपमध्यम पोहे
  2. 1 टेबलस्पून शेंगदाणे
  3. 1 टेबलस्पून डाळव
  4. 1 टेबलस्पून चींच
  5. 1 टेबलस्पून साखर
  6. 1/2 टेबलस्पून जीरे पावडर
  7. 1 टेबलस्पून बारीक चिरलेली काकडी
  8. 1 टेबलस्पून चीरलेला टोमॅटो
  9. 1 टेबलस्पून सीमला मिरची
  10. 1 टेबलस्पून गाजर
  11. 1 टेबलस्पून पर्पल कोबी
  12. 2 टेबलस्पून कोथिंबीर
  13. 1 टेबलस्पून हिरवी मीरची
  14. 1 टेबलस्पून तेल
  15. 1/4 टेबलस्पून मोहरी
  16. 1/4 टेबलस्पून जीरे
  17. 1/4 टेबलस्पून हींग
  18. 1 टेबलस्पून डाळिंबाचे दाणे
  19. 5-6कडीपत्ता

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    प्रथम पोहे मिक्सर मधुन जाडसर पावडर करुन घ्यावी. व एका मोठ्या भांड्यात घालावी.चींच भीजवुन पेस्ट करन घ्यावी.

  2. 2

    भांड्यातील पोह्यांच्या पावडर वर चींच पेस्ट, टोमॅटो घालुन मीक्स करन घ्यावे. नंतर एक एक करत सर्व जीव्नस घालावेत व काकडी, गाजर, पर्पल कोबी, सीमला मीरची व डाळिंबा चे दाणे,व कोथिंबीर घालावी, जीरे पुड, मीठ व साखर घालुन मीक्स करावे.

  3. 3

    एका छोट्या कढईत तेल मोहरी हींग जीरे,हि. मीरची, कडीप्ता, शेंगदाणे डाळव व हळद घालुन फोडणी करुन पोह्यांवर घालुन मीक्स करावे. व वर कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे घालुन मीक्स करावे.

  4. 4

    तयार आहे झटपट होणारी चटपटीत पुड पोहे वर डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर घालुन सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes