तळणिचे पुरणाचे मोदक (talniche purnache modak recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#gur
#गणपती_स्पेशल
आज बाप्पा चे आगमन आणि बाप्पा येनार म्हटले की मोदक तर होणार च
गणतीला मोदक खूप प्रिय आहे म्हणूनच भक्त गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात. पण या परंपरेचे विशेष महत्त्व आहे.
#तळणितले_पुरणाचे_मोदक
'मोद' म्हणजे आनंद आणि 'क' म्हणजे लहान-सा भाग. अर्थातच मोदक म्हणजे आनंदाचा लहान भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' नामक ब्रह्मरंध्र याच्या आवरणाप्रमाणे असतो. आणि कुंडलिनी चे 'ख' पर्यंत पोहचण्याने आनंदाची अनुभूती होते.
हातात ठेवलेल्या मोदकाचा अर्थ आहे की त्या हातात आनंद प्राप्त करण्याची शक्ती आहे. 
मोदक मानाचा प्रतीक आहे म्हणूनच त्याला ज्ञानमोदक असे ही म्हणतात.
सुरुवातीला वाटतं की ज्ञान थोडेच आहे (मोदकाचा वरचा भाग याचा प्रतीक आहे), पण अभ्यास केल्यानंतर समजतं की ज्ञान प्रचंड आहे. (मोदकाचा खालील भाग याचा प्रतीक आहे) अर्थातच ज्ञानामुळे प्राप्त झालेलं आनंदही मोदकासारखं गोड असतं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ ते २०
10 सर्विंग
  1. १ वाटी चना डाळ /हरबरा डाळ
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 वाटी मैदा
  4. 1 वाटीबारीक रवा
  5. चिमुटभरमीठ
  6. 4-5 इलायची किंवा इलायची पावडर
  7. 1 टीस्पूनजायफळ पावडर
  8. तेल /तुप तळण्यासाठी

कुकिंग सूचना

१५ ते २०
  1. 1

    प्रथम चना डाळ छान स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळी धूवून घ्यावे व नंतर कुकरला लावून ४ शिट्या लावून घ्यावेत, व दुसऱ्या बाजूला रवा मैदा व मीठ एकत्र करून पाण्याने भिजवून घ्यावे व

  2. 2

    एका ओल्या कापडाने झाकून ठेवावे व नंतर डाळ कुकरमध्ये छान शिजली की एक जर्मन च्या पातेल्यात काढून गॅस ठेवावे व त्यात साखर घालून छान ढवळत पुरण तयार करून घ्यावे

  3. 3

    व नंतर पुरण छान घट्ट होत आले की त्यात इलायची, जायफळ पावडर घालून छान मिक्स करून ५ मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवावे व नंतर पुरण तयार झाले की थंड करून मिक्सर च्या पॉट मध्ये थोडे थोडे पुरण घालून बारीक पेस्ट करून घ्यावे म्हणजे आपले मोदकांचा पुरण तयार

  4. 4

    नंतर पुरणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे व भिजवून ठेवलेला रवा मैदा चे गोळे करून छोटे पाती लाटून घ्यावी व त्यावर पुरणाचा गोळा ठेवून

  5. 5

    कळ्या दुमडून मोदक तयार करून घ्यावे

  6. 6

    नंतर गॅस वर साजुक तुप गरम करून मोदक तळून घ्यावे अश्या प्रकारे मस्त गणपती बाप्पा चे आवडते मोदक तयार आहे👉

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Asmita Rupani
Asmita Rupani @Tastelover_Asmita
All your recipes are superb and delicious. You can check my profile and follow me if you wish.

Similar Recipes