लाल भोपळ्याचं रायतं (Lal Bhoplyach Raita Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#Ws3
खरंतर भोपळा शरीरासाठी अतिशय चांगला.त्याचे घारगे,कापं,रायतं आवङीने खाल्लं जातं.पण भाजी तितकीशी मुलांना आवङत नाही. पण भोपळा खाल्ला जावा म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारे पाककृती करून खाल्ला पाहीजे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
चार
  1. 1/4 किलो छान घट्ट गर असलेला जुन भोपळा
  2. 2हीरव्या मिरच्या
  3. कोथंबीर
  4. 4-7कङीपत्ता
  5. 1टीस्पून हींग
  6. साजूक तूप फोङणीसाठी
  7. 1छोटा कांदा बारीक कापुन
  8. मीठ व साखर चवीप्रमाणे

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    भोपळ्याची साल काढुन तो पाणी न घालता बंद ङब्यात घालुन कुकरला शिजऊन घ्यावा.

  2. 2

    थंङ झाल्यावर त्याला छान कुस्करून घ्यावे.त्यात मीठ,दही,साखर घालुन नीट मिक्स करावं.

  3. 3

    फोङणी च्या भांङ्यात तुप गरम करून राई,कङीपत्ता,मिरच्या,हींग याची फोङणी करुन भोपळ्यावर घालावी व कोथिंबीर घालावी. छान रायतं तयार झालं.

  4. 4

    ऊपासाच्या वेळी कांदा लसुण न घालता जेवण केलं जातं तेव्हा असं रायतं करावं.
    एरवी त्यात थोङा कांदा बारीक चिरून घ्यावा व मिक्स करावे.थोङी वेगळी चव येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes