लेमन राइस (lemon rice recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#ccs
लेमन राइस ज्याला चित्राण्णा किंवा निम्म्क्या पुलिहोरा असेही म्हणतात हा एक चविष्ट डिश आहे जे बनवणे सोपे आहे आणि चव खूप छान आहे. लिंबाचा रस, तळलेले शेंगदाणे, डाळी व काजू आणि मसाले उत्तम प्रकारे एकत्र करून या वाफवलेल्या तांदळाला आश्चर्यकारक मसालेदार, तिखट चव देतात.

लेमन राइस (lemon rice recipe in marathi)

#ccs
लेमन राइस ज्याला चित्राण्णा किंवा निम्म्क्या पुलिहोरा असेही म्हणतात हा एक चविष्ट डिश आहे जे बनवणे सोपे आहे आणि चव खूप छान आहे. लिंबाचा रस, तळलेले शेंगदाणे, डाळी व काजू आणि मसाले उत्तम प्रकारे एकत्र करून या वाफवलेल्या तांदळाला आश्चर्यकारक मसालेदार, तिखट चव देतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
3-4 सर्व्हिंग
  1. 3 वाट्याबास्मती तांदुळ
  2. 2 चमचेउडदाची आणि चण्याची डाळ प्रत्येकी (1/2 तास भिजत घालावी)
  3. 8-10काजू
  4. 2-3सुक्या लाल मिरच्या
  5. बारीक चिरलेले आले लसूण मिरची
  6. 1-1 1/2लिंबाचा रस
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 चमचाहळद
  9. फोडणीसाठी जीरे , हिंग राई व कढीपत्ता

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून त्यावर 1/2 ते 1 पेर एवढे पाणी, 2चमचे तूप व थोडे मीठ घालून कुकर ला 3 शिट्ट्या घ्याव्या.

  2. 2

    दुसऱ्या बाजूला एका जाड बुडाच्या भांड्यात 4-5 चमचे तूप घालावे. त्यात जीरे, हिंग व राई घालून फोडणी करावी. मग त्यात कढीपत्ता व 2 तुकडे केलेल्या सुक्या लाल मिरच्या घालाव्यात व परतून घ्यावे.

  3. 3

    वरील फोडणी तयार झाली की त्यात भिजवलेल्या डाळी व काजू घालून खमंग वास येईपर्यंत परतून घ्यावे. मग त्यात लिंबाचा रस व हळद घालून व्यवस्थित परतून घ्यावे.

  4. 4

    हे सर्व झाल्यावर कुकर मधला भात काढून वरील फोडणी मध्ये घालावा व व्यवस्थित परतून घ्यावा. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.

  5. 5

    तुम्हाला आवडत असल्यास रस्सम बरोबर गरम गरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes