गोड अप्पे (god appe recipe in marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#mfr
मुलांच्या आवडी निवडी पुर्ण करताना आपण खरंच ना आपल्या आवडीनिवडी विसरून जातो. स्वतः करीता काही करायचे झाल्यास आपल्याला कंटाळा येतो.
आणि मुलांच्या आवडीचे पदार्थ आपल्या आवडीचे कधी झाले हे कळले सुद्धा नाही.
गोड अप्पे मुलांसाठी करत असले तरी आत्ता ते मला खूप आवडतात.... चला तर बघू या रेसीपी...

गोड अप्पे (god appe recipe in marathi)

#mfr
मुलांच्या आवडी निवडी पुर्ण करताना आपण खरंच ना आपल्या आवडीनिवडी विसरून जातो. स्वतः करीता काही करायचे झाल्यास आपल्याला कंटाळा येतो.
आणि मुलांच्या आवडीचे पदार्थ आपल्या आवडीचे कधी झाले हे कळले सुद्धा नाही.
गोड अप्पे मुलांसाठी करत असले तरी आत्ता ते मला खूप आवडतात.... चला तर बघू या रेसीपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. 150 ग्रामरवा
  2. 100 ग्रामखवलेले खोबरे
  3. 100 ग्रामसाखर
  4. 1 कपदुध
  5. 2 टेबलस्पूनदही
  6. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  7. 1 टीस्पूनवेलची पूड
  8. चिमुट भरमीठ
  9. 1/2 टीस्पूनखाण्याचा सोडा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य काढून घ्यावे. एका पातेल्यात खाण्याचा सोडा सोडून सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    वेलची पूड आणि मीठ घालुन छान मिक्स करून घ्यावे. दुधाची गरज वाटल्यास पुन्हा थोडे दूध घालून मिक्स करावे. आणि 15 ते 20 मिनिट झाकून ठेवावे.

  3. 3

    20 मिनिटांनी अप्पेपात्र गरम करण्यास ठेवावे. त्याला तेल लावुन घ्यावे. तयार केलेल्या मिश्रणात सोडा घालून मिक्स करून घ्यावे. आणि अप्पे पात्रात मिश्रण टाकावे. 2 मिनिट झाकून ठेवावे.

  4. 4

    2 मिनिटांनी ॲप्यांची साईड बदलुन 1 मिनिट होऊ द्या. आवडत असल्यास त्यावर साजूक तूप वरुन सोडू शकता.

  5. 5

    गरम गरम अप्पे सर्व्ह करण्यास तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

टिप्पण्या

Similar Recipes