भरली वांगी (कोल्हापुरी) (bharli vangi recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

भरली वांगी (कोल्हापुरी) (bharli vangi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामवांगी (काटेरी जांभळी)
  2. 1 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  3. 1 टीस्पूनधणे पावडर
  4. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  5. 1/2 कपदाण्याचा कुट
  6. मसाल्यासाठी साहित्य
  7. 1/2 कपभाजलेलं सुक खोबर
  8. 1 इंचआल
  9. 4लसूण पाकळ्या
  10. 1/2 कपकोथिंबीर
  11. फोडणीसाठी
  12. मोहरी,हिंग,हळद
  13. 1/2 कपतेल
  14. मीठ चवीनुसार वांगी

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    वांगी स्वच्छ धुऊन त्यावरील काटे काढावे.देठ अर्धा ठेवावा व मसाला भरण्यासाठी चिरा द्याव्या.

  2. 2

    मसाल्यासाठी दिलेले साहित्य मिक्सर मध्ये घालून पाणी न घालता वाटून घ्यावे.

  3. 3

    वाटलेला मसाला ताटात कादून त्यात धणे जीरे पावडर,कांदा लसूण मसाला,दाण्याचा कूट,चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून तेल घालून मिक्स करावे.

  4. 4

    वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरावा.

  5. 5

    कढईत तेल गरम करून मोहरी हिंग हळद यांची फोडणी करावी व त्यावर वांगी परतून घ्यावी. झाकण ठेवून वाफ आणावी.झाकणावर पाणी घालावे.

  6. 6

    वांगी शिजली की उरलेला मसाला घालून मिक्स करावे व लागल्यास त्यात गरम पाणी घालून एक वाफ आणावी. भाकरी,पोळी सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes