मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#EB3 #W3
मटार पॅटीस खायला जितके लाजवाब....तितके करायला किचकट आणि वेळ लागणारे!ताज्या मटारांचे जेव्हा आगमन होते तेव्हा थंडीतली खाण्याची खरी चंगळ सुरु होते.मंडईत मोठमोठे ढीग लावलेले दिसतात...त्यावर एक गुलाबाचं फूल ठेवतात इकडे पुण्याच्या मंडईत हं😄का ठेवतात माहित नाही...🤔१००ला किलोभर असतो तेव्हा फक्त भाजीवाल्यांच्या टोपलीत बघायचा असतो.पण हाच मटार जेव्हा १००ला ४-५किलो मिळू लागतो,तेव्हा खरा आनंद गृहिणीला होतो!🙌मग लगबग होते मटाराचे पदार्थ करायची🤗कितीही वेळा मटाराचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाही येत नाही....इतके लज्जतदार!मटाराच्या शेंगा सोलून दाणे काढणे हे तर एक मोठंच काम असतं...ते सोलायच्या ऐवजी खाण्यातच जास्त जातात.मटार सोलताना न खाणारे खरंच प्रामाणिक असावेत असं माझं मत आहे😉मटारपॅटीस खरे खायचे ते मुंबई ला जाणाऱ्या डेक्कनक्वीन मध्ये किंवा पँन्ट्रीवाल्या कोणत्याही ट्रेनमध्ये....खूपच कुरकुरीत आणि टेस्टी असे हे मटापॅटीस...अगदी खात रहावेत असेच!माझी तर गाडी सुरु होताच कटलेट,मटारपॅटीसची ऑर्डर द्यायची गडबड असते....साधारण लोणावळ्याला ऑर्डर येते...मग घाट चढताना बाहेर बघत बघत हे मटारपॅटीस संपवताना काय मज्जा येते म्हणून सांगू!😊रेल्वेमधला प्रवास अगदी मस्त होतो या मटारपॅटीसच्या साथीने!चला तर...आज खास थंडीसाठी मस्त डीप फ्राय म्हणजे आपले मस्त खरपूस तळलेले हो.....😉मटारपॅटीस खायला..😋बघा तरी चव घेऊन😊👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1:30तास
5व्यक्ती
  1. पॅटीस सारण
  2. 2 कपताजे मटार
  3. 1/2 कपकोथिंबीर
  4. 10-15पुदिना पाने
  5. 1 इंचआले
  6. 4-5तिखट हिरव्या मिरच्या
  7. 1/4 कपओले खोबरे
  8. 2 टीस्पूनधणे जीरे पूड
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 2 टीस्पूनमीठ
  11. 1 टीस्पूनआमचूर पावडर/लिंबाचा रस
  12. 1 टीस्पूनसाखर
  13. 1/2 टीस्पूनहिंग
  14. 1 टीस्पूनजीरे
  15. 1/2 कपतेल
  16. पॅटीस कव्हर
  17. 7-8मोठे बटाटे उकडून
  18. 1 टेबलस्पूनडाळीचे पीठ
  19. 2 टेबलस्पूनमैदा
  20. 6-7ब्रेडचे स्लाईस कुस्करून
  21. 2 टेबलस्पूनमीठ
  22. 1/2 टीस्पूनलाल तिखट(पारीमध्ये घालण्यासाठी)
  23. 1 कपबारीक रवा (पॅटीस घोळवण्यासाठी)
  24. 1 कपमैदा पातळ भिजवून
  25. 1 टीस्पूनमीठ
  26. 1/2 टीस्पूनलाल तिखट(कोरड्या रव्यामधे घालण्यासाठी)
  27. 1/2 टीस्पूनओरेगँनो(ऐच्छिक-रव्यात घालावे)

कुकिंग सूचना

1:30तास
  1. 1

    सारण :
    कढईत तेल तापवावे.त्यात जीरे,हिंग घालून फोडणी करावी.त्यात स्वच्छ धुवून निथळलेले मटार घालावेत.थोडेसे परतावेत.कोथिंबीर, पुदिना, मिरची व आले याची मिक्सरमधून पेस्ट करावी.व ती या मटारावर घालावी.नारळचा चव,आमचूर पावडर/लिंबाचा रस,मीठ साखर,गरम मसाला,धणेजीरे पूड घालून सर्व नीट परतावे.2-3मिनिटे कढई वर झाकण ठेवून मटारास वाफ येऊ द्यावी.

  2. 2

    ही मटार भाजी पूर्ण थंड होऊ द्यावी.मिक्सरमधून मटाराचे हे मिश्रण पल्स मोड वर 2-3वेळा फिरवून घ्यावे.पूर्ण बारीक करायचे नाहीत.अधूनमधून पूर्ण मटारही दिसायला पाहिजेत. अशा प्रकारे सारण तयार करावे.

  3. 3

    बटाट्याचे कव्हर :
    मोठे बटाटे उकडून साले सोलून किसणीवर किसावेत.यामध्ये डाळीचे पीठ,मैदा आणि ब्रेडस्लाईस मिक्सरवर बारिक करून घालाव्यात.तिखट,मीठ,व हवे असल्यास ओरेगँनो घालावे.सर्व गोळा एकत्र मळून घ्यावा.

  4. 4

    आता याचे पॅटीस करण्यासाठी,तळहाताला थोडेसे तेल लावून बोटांनी पारी करावी.त्यात मटाराचे सारण घालून बंद करावे.असे सगळे पॅटीस करुन घ्यावेत.मैदा पाण्यात मध्यम सैलसर भिजवून घ्यावा.यात मीठ,तिखट घालावे. आता हे पॅटीस या मैद्याच्या मिश्रणात बुडवून काढावेत.व डीशमधे ठेवून, 30मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावेत.यामुळे पॅटीस तळताना सुटत नाहीत.

  5. 5

    दुसऱ्या डीशमध्ये बारीक रवा घेऊन आता त्यात फ्रीजमधे सेट झालेले एकेक पॅटीस घोळवून घ्यावेत.कढईत तेल तापत ठेवावे.कडकडीत तेलात मंद आचेवर हे पॅटीस डीप फ्राय करावेत.टिश्युपेपरवर काढून घ्यावेत.एखादी हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम मटार पॅटीस सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes