कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतली. आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतली.
- 2
आता एका वाडग्यात कणिक, बेसन, आलं लसूण मिरची पेस्ट, तिखट मीठ हळद ओवा, दही सर्व मिक्स केले. तेलाचे मोहन मिक्स करून घेतले. व गरम पाणी घालून सॉफ्ट डो बनवला.
- 3
१५-२० मिनीटे ठेवून मग त्यातील लहान गोळा घेऊन पातळ ठेपला लाटला व फ्राय पॅन गरम करून तुपावर ठेपला दोन्ही बाजूंनी शेकून घेतला. असे सर्व ठेपले शेकून घेतले.
- 4
तयार मेथी ठेपले डीशमधे ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.
Similar Recipes
-
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
-
मेथीचे ठेपले/पराठे (methiche parathe recipe in marathi)
मेथीची भाजी मुलं आवडीने खात नाहीत पण ठेपले मात्र खातात.तसेच प्रवासात नेण्यासाठी तर खुपच उपयोगी अशी ही रेसिपी....#EB1 #W1 Sushama Potdar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
-
मेथी ठेपला चीज, कांदा भरलेले (Methi theple cheese kanda bharlele recipe in marathi)
#Healthydiet#winter specialखूप चवदार आणि खूप स्वादिष्ट. Sushma Sachin Sharma -
-
मेथी ठेपले (methi thepla recipe in marathi)
#cooksnap #कल्पना चव्हाण # यांच्या रेसिपी मध्ये मी, दही वापरण्या ऐवजी, ताक वापरून पीठ भिजविले आहे.. बाकी छान झाले आहेत ठेपले... धन्यवाद... Varsha Ingole Bele -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी आरोग्यवर्धक आहे. वजन वाढीवर, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
दुधीभोपळ्याचे ठेपले (dudhibhoplyache theple recipe in marathi)
ठेपले रेसिपीठेपले हा पदार्थ गुजरातचा आहे. वेगवेगळ्या भाज्यांचे ठेपले बनले जातात. कोणी ठेपले किंवा धपाटे, पराठे असे नाव देतात. लहान मुले भाजी खात नाही त्यांना असे भाजी घालून केलेले ठेपले दिले तर ते आनंदाने खातात. तसेच नाष्टा साठी ही पौष्टिक असे ठेपले केले जातात. प्रवासासाठी ही हे ठेपले घेऊन जाता येतात. हे ठेपले 2 ते 3 दिवस छान राहतात. मी आज दुधीभोपळ्याचे पौष्टिक ठेपले रेसिपी पोस्ट करत आहे. कसे झाले ते सांगा. Rupali Atre - deshpande -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#सोमवार _मेथी_पराठा#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
बाजरा मेथी ढेबरा (bajara methi dhebara recipe in marathi)
Cooksnap मी ही रेसिपी अंजली मुळे पानसे ह्यांची बघून केलीय ,खूप टेस्टी व छान झाली Charusheela Prabhu -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#सोमवार- मेथी पराठा Sumedha Joshi -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#CDY#Childrens_day_recipe#मेथी_पुरी 14 नोव्हेंबर बालदिन..खरंच बालपण किती सुखाचा काळ असतो ना..तुकाराम महाराज पण म्हणतात..लहानपण देगा देवा..मुंगी साखरेचा रवा..आपल्या आयुष्यातील अत्यंत अनमोल असा सोनेरी काळ च म्हणा ना..कुठलीही चिंता नाही ,व्याप नाही,जबाबदार्या नाहीत..अंगावर मोठेपणाची झूल नाही..कोण काय बोलेल याची पर्वा नाही..खेळकरपणा,व्रात्यपणा करत खोड्या काढायच्या,चिडवाचिडवी करायची..लटके रागवायचे..दुसर्या क्षणाला भांडणं विसरुन पुन्हा एकत्र खेळायचं..असा सदैव कट्टीबट्टीचा खेळ..क्षणात आसू अन् क्षणात हसू ..तेच आणि तेवढच विश्व असतं ते..तेवढ्याच परिघात मित्रपरिवारासमवेत हुंदडणं बागडणं सुरु असतं..भूक लागली की आईकडे हे नको ते नको करत आवडीच्याच पदार्थांसाठी धोशा लावायचा..बाबांकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी हट्टाने मागून घ्यायच्या..वेळप्रसंगी फतकल मारुन रस्त्यात बसायचं..वरच्या टीपेचा आवाज काढून हमसाहमसी रडून गोंधळ घालून आपलं म्हणणं खरं करायचं..आणि मग विजयी हास्य करायचं..बरं नसेल तेव्हां आईच्या कुशीत निजायचं..पडू आजारी मौज हीच वाटे भारी म्हणत भावंडांकडून लाड करुन घ्यायचे..आजीआजोबांचे लाड कौतुक तर विचारुच नका..दुधावरच्या सायीला ते पण फारच जपतात..रोज गोष्टींचा रतीब हक्काने त्यांना घालायला लावायचा..यातल्या अर्धा टक्का गोष्टी तरी आपल्याला मोठं झाल्यावर जगायला मिळत नाहीत..आपलं आयुष्य सतत मुखवटे घालूनच जगायला लावतं आपल्याला..असं सगळं असलं तरी तो सोनेरी काळ आठवणींतून जोपासायचा आपण..आपल्यातलं हसरं,खेळकर,व्रात्य मूल जिवंत ठेवायचं😊तर अशा या सुखाच्या बालपणात मला आईने केलेल्या मेथी पुर्या खूप आवडायच्या..माझ्या मुलांनादेखील या मेथी पुर्या आवडतात..चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
बाजरा मेथी ढेबरा (bajara methi dhebara recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4रेसिपी8आवडते_पर्यटन_शहर#वडोदरा (बडोदा)गजरात एक रंगीबेरंगी, उत्साहाने ओसंडून वाहणारा प्रदेश. आम्ही जानेवारीत स्टँच्यु आँफ युनिटी बघायला बडोद्याला गेलो होतो. तीथे मंगलदास मार्केट जवळच्या एका दुकानात आम्हाला हे ढेबरा मिळाले. मस्त हेल्दी,चविष्ट स्नँकचा प्रकार प्रवासात ही नेऊ शकतो असा हा पदार्थ आज नाश्त्याला केला. सगळ्यांचा आवडता आणि बाजरी न आवडणाऱ्यांना सुद्धा सहज आवडेल असा पदार्थ😋😋 Anjali Muley Panse -
मेथी चे थेपले (methi chi theple recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मेथीचे थेपले आज काल सगळेजण मेथी पराठा वगैरे बनवतात. गुजरात मध्ये थेपले बनवण्याची पद्धत आहे. गुजरात मध्ये फिरायला गेलो कि कपड्याचे मार्केट वगैरे डोळ्यासमोर येतेच. तसेच अनेक मैत्रिणी गुजराती असल्यामुळे हे मेथीचे थेपले पण खुप आवडतात Deepali Amin -
मेथी वडी (methi vadi recipe in marathi)
#tmr 30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी मी इथे मेथीच्या वड्या बनवल्या आहेत. मेथीच्या वड्या अगदी झटपट तयार होतात. मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रमाणे खुसखुशीत लागणाऱ्या मेथीच्या वड्या बनवून नक्की खाव्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
बाजरा मेथी ढेबरा (bajra methi debra recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap_Challenge#बाजरी_रेसिपी आज मी माझी मैत्रीण @Anjaliskitchen_212 अंजली मुळे पानसे हिची बाजरा मेथी ढेबरा ही गुजराती स्नॅक्स ची रेसिपी Cooksnap केली आहे..अंजू,अतिशय खमंग , चमचमीत झाले आहेत बाजरा मेथी ढेबरा..😋😋मला याची चव खूप आवडली..❤️..Thank you so much dear for this delicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
-
-
-
पौष्टिक मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#PRN मेथीची भाजी खाण्यास मुलं कंटाळा करतात.पण हेच वय त्यांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असते.. मग त्यांना पोषक जीवनसत्व आहारातून मिळावेत.मग त्या साठी आपण एक आई म्हणून माझा प्रयत्न... Saumya Lakhan -
तिखट मीठाच्या मेथी पुर्या (tikhat mithachya methi purya recipe in marathi)
#ashr आषाढी स्पेशल पुर्या आणि त्या पण तिखट, आमच्या घरात सर्वांना आवडतात. आज मी तिखट मीठाच्या मेथी पुर्या सकाळी चहा नाश्त्याला बनवल्या. Varsha S M -
-
मेथी थेपले (Methi Theple Recipe In Marathi)
#नाष्ट्यासाठी हेल्दी व पोटभरीचा पदार्थ मेथीचे थेपले करायला पण सोप्पे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
कसूरी मेथीचे ठेपले (kasuri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20 #theple#कसूरी_मेथीचे_ठेपलेताज्या ताज्या ओल्या हिरव्यागार मेथीचे ठेपले खूप मस्त लागतात. पण जर मेथीचे ठेपले खावेसे वाटले आणि घरात जर ताजी मेथी नसेल तर कसूरी मेथीचे ठेपले पण खूप छान खमंग खुसखुशीत बनवता येतात. अगदी झटपट बनणारे आणि खायला पण एकदम मस्त टेस्टी लागतात. टिफीन मधे द्यायला पण पटकन होत असल्याने बरं पडतं. आज मी कसूरी मेथीचे ठेपले बनवले आहेत. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#md"मेथी थेपला" मला नाही आठवत अगदी स्वतः कमवायला लागे पर्यंत मी कधी हॉटेल ला जाऊन जेवली असेन, किंवा काही खाल्लं असेल कधीच नाही....!! फार फार तर एखादा वडापाव तो ही शाळेजवळ, आईच्या माहिती बाहेर... गुपचूप...!!😉 बाबांना बाहेरच जेवण कधीच आवडायचं नाही,आणि आई तर स्ट्रिक्टली घरचेच जेवण जेवायचं या तत्वांची...😊😊 जेव्हा कधी गावी किंवा बाहेर जायचं म्हटलं...की माझी आई नेहमी असे थेपले किंवा चपाती भाजी, पुरी भाजी, सुका जवळा भाकरी अस काहीतरी सोबत करून घ्यायची, तिला वाटे की प्रवासात बाहेरच खाण्यापेक्षा घरच पौष्टिक खाण नेहमीच चांगल...!!आणि आईच्या हातचं... काहीही खाण म्हणजे निव्वळ स्वर्गसुख...!! माझ्या आईची थेपला रेसिपी आज शेअर करत आहे, जी मी बहुतेक वेळा करते, माझा मुलगा पण मला नेहमी सांगतो, की आजी बनवते तसे थेपले करून दे.... ☺️☺️ मागे न लागता, मूल स्वतःहून काही पौष्टिक खायला मागतात...या सारखं सुख या जगात तरी नाही...!!😊😊 Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15959905
टिप्पण्या