ओटस कुकीज (Oats cookies recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुकीज साठी मी माझी ओटस कुकीज ही रेसिपी आज पोस्ट करत

ओटस कुकीज (Oats cookies recipe in marathi)

#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुकीज साठी मी माझी ओटस कुकीज ही रेसिपी आज पोस्ट करत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन
  1. 1/2 कपबटर (110 ग्रॅम)
  2. 1/2 कपपिठी साखर,(60 ग्रॅम)
  3. 1.5केळी (दिड केळ 100 ग्रॅम)
  4. 1.5 कपओट्स (170 ग्रॅम)
  5. 3/4 कपमैदा (110 ग्रॅम)
  6. 1/4 चमचाबेकिंग सोडा
  7. 1/4 चमचादालचिनी पावडर
  8. 1/4 चमचामीठ
  9. 1 चमचाव्हॅनिला इसेन्स
  10. 1/4 कपमनुके
  11. 1/4 कपचोको चिप्स

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका बाउल मध्ये अर्धा कप बटर घेतले. मग त्यात अर्धा कप साखर घालून बिटरच्या सहाय्याने चांगले फेटून घेतले.

  2. 2

    मग वरील मिश्रणात दिड केळे स्लाइस करून घातले. व पुन्हा चांगले फेटून घेतले. नंतर त्या मिश्रणात दिड कप ओट्स आणि पाऊण कप मैदा मिक्स करून घेतले.

  3. 3

    नंतर त्यात पाव चमचा बेकिंग सोडा, पाव चमचा दालचिनी पावडर, पाव चमचा मीठ, एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालून चांगले मिक्स करून घेतले.

  4. 4

    मग वरील मिश्रणात पाव कप मनुके, आणि पाव कप चोको चिप्स घालून चांगले मिक्स करून घेतले.

  5. 5

    नंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतले. व बेकिंग ट्रेला बेकिंग पेपर लावून त्यावर छोटया गोळ्यांना थोडे दाबून चप्पट करून घेतले.

  6. 6

    मग 190 सेंटीग्रेटला 10 मिनिटे गरम करून घेतले. 10 मिनिटानंतर कुकीज 10 ते 15 मिनिटे बेक करून घेतले.

  7. 7

    आता आपली ओटस कुकीज पूर्णपणे थंड झाल्यावर सर्व्ह करण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes