काळा मसाला (Kala masala recipe in marathi)

Nandini Joshi
Nandini Joshi @Nandini_281
Ahmednagar

खाद्यपदार्थांमध्ये थोडा काळा मसाला घातला त्याची चव तोंडात कायम राहते. मसाल्याचा खमंग सुवास घरभर पसरतो. गोडा मसाला घालून केलेली भाजी आणा आमटी खावून पाहा...एकदम भारी !!!

काळा मसाला (Kala masala recipe in marathi)

खाद्यपदार्थांमध्ये थोडा काळा मसाला घातला त्याची चव तोंडात कायम राहते. मसाल्याचा खमंग सुवास घरभर पसरतो. गोडा मसाला घालून केलेली भाजी आणा आमटी खावून पाहा...एकदम भारी !!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
  1. 1/2 किलोधणे
  2. १२५ ग्रॅम जीरे
  3. १२५ ग्रॅम तीळ
  4. १२५ ग्रॅम कारळे
  5. १२५ ग्रॅमकिसलेलं खोबरं
  6. ५० ग्रॅम खसखस
  7. १२५ ग्रॅम सुक्या मिरच्या
  8. २० ग्रॅम खडा हिंग
  9. 10 ग्राम लवंग
  10. 10 ग्राम दालचीन
  11. 10 ग्राम काळी मिरी
  12. 1/2 टीस्पूनमेथी दाणे
  13. 2 चमचेमोहरी
  14. 4 टेबलस्पूनहळद
  15. 10 ते १२ तमालपत्र
  16. 10 ग्रॅमनागकेशर
  17. 2 चमचेतेल भाजण्यासाठी

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    प्रथम धणे मंद गुलाबी रंगावर कोरडे भाजून घ्यावेत. नंतर जिरं, तीळ, खसखस, कारळे आणि सुकं खोबरं मंद वेगवेगळं खमंग भाजून घ्यावे.

  2. 2

    त्यानंतर थोडया तेलावर तमालपत्र, लवंग, दालचिनी, मोहरी आणि मेथीदाणे, लाल मिरच्या, हळद आणि खडा हिंग तळून घ्यावा.

  3. 3

    हे सगळ साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि एकत्र मिसळून घ्या.

  4. 4

    हा मसाला घट्ट फिरकीच्या बरणीत भरून ठेवावा. हा मसाला मूग डाळ खिचडी, भरली वांगी, आंबटगोड आमटी, उसळी यांना वापरतात. पदार्थ एकदम टेस्टी आणि चविष्ट होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nandini Joshi
Nandini Joshi @Nandini_281
रोजी
Ahmednagar
अन्न हे पूर्णब्रह्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes