उपासाचे पॅटीस (upwasache patties recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#fr
मलाई पनीर वापरून हे उपासाचे पॅटीस मस्त होते आणि तूप तेल दोन्हीचा वापर केल्यामुळे छान खरपूस पॅटीस भाजले जातात.

उपासाचे पॅटीस (upwasache patties recipe in marathi)

#fr
मलाई पनीर वापरून हे उपासाचे पॅटीस मस्त होते आणि तूप तेल दोन्हीचा वापर केल्यामुळे छान खरपूस पॅटीस भाजले जातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपकिसलेले मलाई पनीर
  2. 1/2 कपउकडून किसलेला बटाटा
  3. 1/2 कपउकडून किसलेले रताळे
  4. 1/2 कपशेंगदाणे कूट (जाडसर)
  5. 1/2 कपअरारोट पीठ
  6. 1/2 कपसाबुदाणा पीठ
  7. 1 टेबलस्पूनआलं मिरची कोथिंबीर पेस्ट
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. चवीनुसारमीठ
  10. 1/2 टीस्पूनसाखर
  11. 1/2 टीस्पूनतिखट
  12. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    आलं मिरची कोथिंबीर जीरे साखर मीठ थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. परातीमध्ये पनीर बटाटा रताळे किसून घ्या अरारोट पीठ साबुदाणा पीठ शेंगदाणे कूट तिखट मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट लिंबू रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून गोळा करून पॅटीस करून घ्या.

  2. 2

    तवा गरम तेल घालून पॅटीस भाजून घ्या आणि वरच्या बाजूने तूप घालून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

  3. 3

    लिंबू लोणचे /उपासाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा. (शेंगदाणे कूट जाडसर वापरल्यामुळे चव छान लागतं.अरारोट पीठ नसल्यास‌ राजगिरा पीठ/शिंगाडा पीठ वापरू शकता.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes