कॅरोट कस्टर्ड डीलाईट (Carot custard delight recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#HSR.... होळीच्या सणाला, वेगवेगळ्या पदार्थ केल्या जातात... पारंपरिक, आणि नवीन सुद्धा... मी पण आज केले आहे, या काळात मिळत असलेल्या गाजराचे, कॅरोट कस्टर्ड डेलाईट... एक पौष्टिक आणि चविष्ट dessert..
उन्हाळ्याची चाहूल लागत असताना बनविलेले...

कॅरोट कस्टर्ड डीलाईट (Carot custard delight recipe in marathi)

#HSR.... होळीच्या सणाला, वेगवेगळ्या पदार्थ केल्या जातात... पारंपरिक, आणि नवीन सुद्धा... मी पण आज केले आहे, या काळात मिळत असलेल्या गाजराचे, कॅरोट कस्टर्ड डेलाईट... एक पौष्टिक आणि चविष्ट dessert..
उन्हाळ्याची चाहूल लागत असताना बनविलेले...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35-40 मिनिट
  1. 1/2 किलोगाजर हलव्यासाठी
  2. 2 टेबलस्पूनतूप
  3. 1/4 लिटरदूध साई सह
  4. 1/4 कपकंडेन्स्ड मिल्क
  5. 1/4 कपसाखर
  6. सुकामेवा
  7. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  8. कस्तार्ड करिता
  9. 1/2 लिटरदूध
  10. 2 टेबलस्पूनcustard पावडर
  11. 1 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  12. 1/4 कपसाखर
  13. 2 टेबलस्पूनकंडेन्स्ड मिल्क
  14. 1 टेबलस्पूनसुकामेवा
  15. सजावटीसाठी सुकामेवा काप, रंगीत sprinklers

कुकिंग सूचना

35-40 मिनिट
  1. 1

    गाजर किसून घ्यावे. कढईत तूप टाकून, त्यात किस टाकून, तो नरम होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात दूध टाकून ते आटवून घ्यावे. नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि साखर घालून छान आटवून घ्यावे. आता त्यात सुकामेवा आणि, वेलची पूड घालून, मिक्स करावे. आणि गॅस बंद करावा. गाजर हलवा तयार आहे.

  2. 2

    हलवा तयार होत असतानाच एका बाजूला custard बनविण्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये दूध उकळविण्यास ठेवावे.

  3. 3

    2-3 उकळ्या आल्यावर, त्यात साखर आणि कंडेन्स्ड मिल्क टाकावे. आणि उकळी आणावी. दुसरीकडे, दोन टेबलस्पून दुधात, custard पावडर टाकून चांगले मिक्स करावे.

  4. 4

    त्यातच कॉर्न फ्लोअर टाकून मिक्स करून घ्यावे. आता हे मिश्रण, उकळलेल्या दुधात हळू हळू टाकत मिक्स करावे. यावेळी गॅस कमी असावा.

  5. 5

    4-5 मिनिट सतत फिरवत, शिजू द्यावे. साधारण घट्ट झाल्यावर, गॅस बंद करावा, त्यात सुकामेवा घालून मिक्स करून घ्यावे. आता तयार custard आणि गाजर हलवा थंड होऊ द्यावा.

  6. 6

    आता सेट करण्यासाठी, एखाद्या खोलगट ट्रे मध्ये, आधी गाजर हलवा टाकून, चांगला दाबून, एकसारखा करून घ्यावा. त्यानंतर त्यावर तयार custard टाकून पसरवून घ्यावे. वरून, सुकामेवा काप, रंगीत स्प्रिंकलेर, आणि सिल्व्हर बॉल्स टाकावे.

  7. 7

    आणि थंड करण्यासाठी, सोईनुसार फ्रीज मध्ये किंवा फ्रिझर मध्ये ठेवावे. छान कडक व्हायला हवे.

  8. 8

    नंतर, सेट झाल्यावर, सुरीने, पाहिजे त्या आकाराचे कापून घ्यावे. मस्त, थंडगार carrot custard delights, सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes