ॲप्पल कस्टर्ड विथ सब्जा (apple custard with sabja recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#makeitfruity ... सफरचंदाचा वापर, संत्री आणि सब्जा, यासोबत करून, स्वादिष्ट ॲप्पल कस्टर्ड विथ सब्जा बनविले आहे... Dessert म्हणून एकदम मस्त...

ॲप्पल कस्टर्ड विथ सब्जा (apple custard with sabja recipe in marathi)

#makeitfruity ... सफरचंदाचा वापर, संत्री आणि सब्जा, यासोबत करून, स्वादिष्ट ॲप्पल कस्टर्ड विथ सब्जा बनविले आहे... Dessert म्हणून एकदम मस्त...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 500 मि.ली.दूध
  2. 1-1/2 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर
  3. 3 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टीस्पूनसब्जा
  5. 1सफरचंद फोडी करून
  6. 2-3संत्राच्या फोडी सोलून
  7. सजावटीसाठी टूटीफ्रूटी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सुरुवातीला पसरट भांड्यात दुध गरम करायला ठेवावे.संत्री सोलून त्याच्या फोडी सोलून घ्यावेत. सफरचंदाची साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात.

  2. 2

    सब्जा अर्धी वाटी पाण्यात भिजत घालावे दहा मिनिटे. त्यानंतर तीन टेबलस्पून कोमट दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यावे. पाच मिनिटे दूध उकळल्यावर त्यात साखर घालून घ्यावी.

  3. 3

    दोन मिनिटात साखर विरघळल्यावर त्यात दुधात मिक्स केलेले कस्टर्ड पावडर टाकून चमच्याने मिक्स करत राहावे. आता हे कस्टर्ड मिश्रित दूध, एक उकळी आली,की गॅस बंद करावा. आणि दूध थंड करावे.

  4. 4

    आता या थंड झालेल्या दुधात सफरचंद आणि संत्र्याची फोडी टाकून मिक्स करावे. हे ॲपल कस्टर्ड तयार आहे. हे फ्रीज मध्ये गार करण्यास ठेवावे. आता सर्व्ह करण्यासाठी काचेचे ग्लास घ्यावे. त्यात आधी थोडे कस्टर्ड टाकावे. नंतर त्यात भिजलेला सब्जा टाकावा.

  5. 5

    वरून पुन्हा कस्टर्ड टाकावे. वरून थोड्या सफरचंदाच्या फोडी घालून, सजावटीसाठी tuti fruity घालावी. आणि असे हे थंडगार कस्टर्ड सर्व्ह करावे...

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Top Search in

Similar Recipes