टोमॅटो ऑम्लेट (Tomato omelette recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#SFR#street_food_recipes
आपला भारत खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत खरंचंच वैविध्यपूर्ण आहे.कश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून बंगाल पर्यंत प्रांतागणिक खाद्यपदार्थात हवामानानुसार आणि उपलब्ध पिकांनुसार विविधता आढळते.तसंच "वसुधैव कुटुंबकम्।"या उक्तीनुसार आपण एकमेकांची खाद्यसंस्कृतीही आपलीशी केली आहे.उदाहरण द्यायचे तर दक्षिणेकडील इडली, डोसा,उत्तप्पा,अप्पम,आप्पे...इ.,तर उत्तरेकडील चाटचे पदार्थ, छोले,दहीवडे,पुलाव,बिर्याणी, गुजरातचा ढोकळा,फापडा,खाकरा,फरसाण,कचोरी,मध्यप्रदेश तर खवैय्यांचीच राजधानी...तिथल्या सराफा बाजारात संध्याकाळी लागणाऱ्या ठेल्यांवर तर काय मिळत नाही?....,प.बंगालमधली मिठाई,पापरी चाट,मोमोज,दम आलु-लुची,राईस-फिशकरी,पुचका,काठीरोल...!आपल्या मुंबईच्या चौपाटीवरील भेळ,पाणीपुरी,सँडविच, वडापाव,बाँबे पावभाजी असं कितीतरी!!आणि पुणे,कोल्हापूरची खास मिसळ....
पूर्वी खरं तर बाहेरचं खाणं घरच्यांना अजिबात चालत नसे.तसं मिळायचंही फार कमीच.आजच्या इतकी विविधता तर मुळीच नव्हती.फार तर भेळ,शेवचिवडा असंच मिळे!बाहेरचं खाताना स्वच्छता,वापरलेले पाणी याची खात्री नसे.आता आरोग्यविभागातर्फे स्वच्छता,पाणी यांचे निकष तपासले जातात.रस्त्यावरचे खाणे आता खूपच कॉमन झालंय.कामांचे वाढलेले तास,धावपळ,करायला वेळ न मिळणं आणि भुकेच्या वेळी पटकन उपलब्ध असते म्हणूनही स्ट्रीट फूडची पसंती वाढतेय...तसंच वीकेंड मँनिया..हॉटेल्सपेक्षा स्वस्त आणि पोटभरीचे म्हणूनही या खाद्यपदार्थांना भरपूर मागणी असते.आज बनवलेले टोमॅटो ऑम्लेट मी तिरुपतीमधील एका स्टॉलवर पाहिले होते.आपल्याकडे डाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठात टोमॅटो प्युरी,दही घालतात,पण फरमेंटेड नसते..डोशाच्या पीठाचेच असे थोडे वेगळे टॉमेटो ऑम्लेट चला...ट्राय करुया!👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 व्यक्ती
  1. 2 कपउकडा तांदूळ
  2. 1/2 कपउडीद डाळ
  3. 3 टेबलस्पूनहरभरा डाळीचे पीठ
  4. 3मोठ्या टोमॅटोंची प्युरी
  5. 1/2 कपकोथिंबीर बारीक चिरून
  6. 1.5 टीस्पूनमीठ
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  9. हिरवी चटणी
  10. 1/2नारळाचा चव
  11. 1/2कैरीचा कीस(ऐच्छिक)
  12. 4हिरव्या मिरच्या
  13. 1/4 इंचआलं
  14. 1/4 कपकोथिंबीर
  15. 1/4 कपडाळं
  16. चवीनुसारमीठ व साखर व थोडेसे पाणी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    उकडा तांदूळ आणि उडीदडाळ स्वतंत्र 3-4तास भिजत घालून डोशासाठी वाटतो तसे बारीक वाटावे व फरमेंट होण्यास ठेवावे.
    8तासांनी पीठ छान फरमेंट होते.टोमॅटो ऑम्लेट साठी 2टोमॅटो प्युरी साठी वापरावेत.व एक बारीक चिरावा.कोथिंबीर,मिरच्या बारीक चिरुन घ्यावे.पीठामध्ये मीठ व टोमॅटो प्युरी घालावी.

  2. 2

    हरभरा डाळीचे पीठ भिजवून घ्यावे.व वरील पीठात घालून चिरलेली कोथिंबीर व मिरच्या तसेच हळद घालावी.सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे.डोशाचा नॉनस्टिक तवा तापत ठेवून तेलाने थोडा ग्रीस करावा.

  3. 3

    तव्यावर पीठ घालून जाडसर असे पसरावे. त्यावर चिरलेला टोमॅटो घालावा.वरुन चमचाभर तेल सोडावे.2 मिनिटांनी उलटावा.सर्व बाजूंनी छान होऊ द्यावा.

  4. 4

    हिरवी चटणी विभागात दिल्याप्रमाणे सर्व साहित्य घेऊन थोडेसे पाणी घालून मिक्सरवर चटणी बारीक वाटावी.

  5. 5

    गरमागरम टोमॅटो ऑम्लेट बरोबर हिरवी चटणी घालून डीश सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes