गव्हाच्या कुरडया (Gavhyachya kurdaya recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#उन्हाळा_वाळवण
उन्हाळा आणि वर्षभरासाठी साठवणीची वाळवणं हे ठरलेलंच.या वाळवणांना खूप जुनी परंपरा आहे.आजच्याइतके सहज अशा कोणत्याही भाज्या सदैव मिळत नसत,त्याला पर्याय म्हणून,तसंच तोंडीलावणी म्हणून ही वाळवणं केलेली असली की स्वयंपाकही सोपा होऊन जाई.या वाळवणात येतात प्रामुख्याने कुरडया,उडदाचे,,मुगाचे,नाचणीचे,ज्वारीचे पापड,सांडगे,खारवडे,भुसवड्या,साबूदाणा पापड्या,बटाट्याचा कीस,तांदळाच्या सालपापड्या,तसंच हातशेवया,सांडगी मिरच्या तसंच हळद,तिखट,शिकेकाई हे सुद्धा व्हायचे!उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश असतो.ह्या उर्जेचा पूर्वापार वापर आपल्या सुगरणींनी खुबीने केला आहे.
कुरडई बद्दल तर मला लहानपणापासून खूप आकर्षण आहे.आमच्याकडे पापड,कुरडया,सांडगे सगळे व्हायचेच!आईला भरपूर मदत करावी लागायची.अर्थात तिचा उरक तर दांडगा होता.तेच सगळं अंगवळणी पडल्यामुळे अजूनतरी निदान कुरडया तरी करतेच...तसंच गव्हाचा शिजवलेला गरम चीक खाण्याची लज्जत औरच...तोही फक्त खाण्यासाठीही वेगळा करायचा!गव्हात ग्लुटेन असतं हे आता आता मला समजले...पण गव्हाचा चीक करतात एवढेच माहिती होते आणि हा चीक म्हणजे एकदम शक्तीवर्धक असतो असं आई म्हणायची....तर,कुरडई खायला जेवढी सोपी तितकी करायला मात्र किचकट,अवघड!स्त्रियांच्या पेशन्सचा कडेलोटच म्हणा ना!केवढी प्रोसेस या कुरडयांना...पण सणावाराला नैवेद्यासाठी ही कुरडई हवीच!सगळं कौशल्य पणाला लागतं ते चीक हाटताना...त्याला अनुभवी हातच हवेत!आणि नजरही....हल्ली बहुतेक वाळवणाचे सगळे विकतच आणणे बरे पडते,कारण इतका वेळ नसतो,वाळवणांना जागा नसते,श्रम सोसत नाहीत,खूप प्रमाणात घरी लागेल असंही नाही,हे सुद्धा खरेच...तर अशी ही कुरडई ...घरीच कशी करायची ते पाहू!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2.5 किलोलोकवान जुना गहू
  2. गहू भिजतील एवढे पाणी-अंदाजे
  3. गहू वाटण्यास पाणी-थोडेसे
  4. वाटलेल्या गव्हाचा चीक गाळण्यास भरपूर पाणी लागते
  5. चीक शिजवताना
  6. 1पातेले निवळलेला चीक
  7. 1पातेले पाणी उकळलेले
  8. 3-4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    गहू निवडून घ्यावेत.धुवावेत आणि पूर्ण बुडतील एवढे भिजवावेत. सलग 4दिवस तरी भिजवावेत. दररोज यातील पाणी बदलावे.अनारशांच्या तांदळाचे बदलतो तसे...याने फार आंबटपणा आणि वास येत नाही.चार दिवसांनी हाताने एखादा गहू दाबून पाहिल्यास त्यातून चीक बाहेर पडतो.यावरून गहू भिजलेत समजावे.मी इलेक्ट्रीक वेट ग्राइंडरवर गहू वाटले आहेत.

  2. 2

    सर्व गहू बेताचे पाणी घालून वाटावेत व मोठ्या पातेल्यात काढावेत.हे वाटलेले गहू पूर्ण बुडतील एवढे भरपूर पाणी घालावे.यामुळे गव्हाचा चीक मोकळा होतो.आता हाताने गव्हाची सालं पाण्यातून वेगळी करुन दाबून गोळा करावीत.नंतर सर्व चीक थोड्या मोठ्या चाळणीने गाळून घ्यावा.नंतर सपीठीच्या चाळणीने व नंतर पंच्याच्या फडक्यावर गाळून पूर्ण कोंडा धुवून पिळून काढावा.हा झाला कुरडईचा चिक!

  3. 3

    मोठ्या पातेल्यातील चीकात आता भरपूर पाणी व चीकही आहे.रात्रभर स्थिर ठेवल्यावर सर्व घट्ट चीक तळाशी बसतो व निवळशंख पाणी वर रहाते.

  4. 4

    सकाळी कुरडया करायच्या वेळी हे निवळलेले पाणी हलके हलके पूर्ण काढावे.ओतून द्यावे. हातानेही सहज निघणार नाही असा तळाशी बसलेला चीक उलथण्याने मोकळा करावा.
    सर्व चीक किती पडलाय ते मोजून घ्यावे.त्यातून आपल्याला हाताने हाटायला झेपेल इतका चीक दुसऱ्या पातेल्यात घ्यावा.तितकेच पाणी उकळत ठेवावे.पूर्ण उकळल्यावर चवीनुसार मीठ घालावे.

  5. 5

    यातील थोडेसे पाणी बाजूला काढावे.व पातेल्यातील चीकाची धार उकळत्या पाण्यात हळूहळू सोडावी व एकीकडे लाटण्याने चीक हलवत रहावा.गुठळ्या अजिबात होऊ देऊ नयेत.चीक पटापट शिजतो,त्यामुळे भरपूर व भरभर हाटावा लागतो.👇असा चीक शिजून तयार होतो.बाजूला काढलेले पाणी आता यात घालून सारखा करावा व घट्ट झाकण घालून 6-7मिनिटे दणकून वाफ येऊ द्यावी.वाटीत पाणी घेऊन थोडा छोटा चीकाचा गोळा यात टाकावा.पूर्ण तळाशी बुडल्यास चीक झाला समजावे.

  6. 6

    शिजलेल्या चीकाच्या प्लॅस्टिकच्या कागदावर चीक गरम असतानाच सोऱ्याने कुरडया भराभर घालाव्यात.जाळी थोडी मोठी वापरावी,कारण वाळल्यावर कुरडया लहान होतात आणि तळताना ब्राऊन होत नाहीत.

  7. 7

    कुरडयांना हात गुंतले असल्याने फारसे स्टेप्स फोटो शक्य झाले नाहीत.भरपूर उन्हात 3-4दिवस कुरडया कडकडीत वाळवाव्यात. व हवाबंद डब्यात भरुन ठेवाव्यात.वर्षभराची बेगमी होते आणि सणावारी लागणारे हे घरचेच पदार्थ मिळू शकतात.तसंच एरवीही मुगाची खिचडी,वरणफळं किंवा वन डीश मील केल्यावर कुरडया तळाव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes