खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनीटे
  1. 1 मेजरींग कप कणिक
  2. 1/2 मेजरींग कप मैदा
  3. 1/4 मेजरींग कप तेल (मुठ वळेपर्यंत)
  4. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  5. 1 टिस्पून जीरे
  6. 1 टिस्पून ओवा
  7. 8-10मीरे
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

४० मिनीटे
  1. 1

    प्रथम जीरे, ओवा,मीरे ह्यांची भरड करून सर्व साहित्य संकलित केले. एका वाडग्यात कणिक मैदा चाळून घेवून त्यात जीरे,मीरे, ओवा ह्यांची भरड घालून मिक्स केले.

  2. 2

    मग त्यात तेलाचे मोहन पीठाची मुठ वळेपर्यंत घालून चांगले चोळून घेतले. थोडे थोडे पाणी घालून गोळा मळून घेतला. व अर्धा तास झाकून ठेवला.

  3. 3

    आता त्या गोळ्यातील नीम्मा गोळा घेऊन त्याची पोळी लाटली व शंकरपोळे कट केले. मग गॅसवर कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर शंकरपाळे घेतले.

  4. 4

    तयार खारे शंकरपाळे बाऊलमधे काढून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes