मशरुम-बेबीकॉर्न व्हेज करी (Mushroom Babycorn Veg Curry Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

weekend_sundayspecial
बेबीकॉर्न आणि मशरूम दोन्हीही भरपूर प्रोटीनयुक्त.अधेमधे सूप,पिझ्झा, काही स्टार्टर्स करण्यासाठी मी नेहमी हे आणून फ्रीझमधे ठेवते.कधीकधी त्याच त्या भाज्या किंवा पालेभाज्या खाऊन कंटाळा आला की काहीतरी वेगळी डीश करु शकतो. आमच्याकडे या भाज्याही आवडतात.
रविवार दुपार म्हणजे सगळे घरी...मस्त आंब्याचे दिवस,त्यामुळे दररोज रस तर होतोच,पण त्याबरोबर टँगी अशी भाजी ती पण ग्रेव्हीवाली हवीच!...तीसुद्धा हटकेच,अशी सगळ्यांची फर्माईश!cookpad थीम आहे की नाही काही...?असे सगळ्यांनी विचारले.फ्रीजमध्येही exotic भाज्यांपैकी बेबीकॉर्न आणि मशरूम होतेच त्यामुळे आजच्या weekendच्या दुपारच्या जेवणात मशरूम-बेबीकॉर्न व्हेज करीने मजा आली!👍😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5व्यक्ती
  1. 2packs बटण मशरूम(200gm.चे)
  2. 2packs बेबीकॉर्न
  3. 3मोठे टोमॅटो
  4. 1मध्यम कांदा
  5. 1लसुण गड्डा
  6. 4-5मीरे
  7. 2-3तमालपत्रं
  8. 15काजू
  9. 1 टीस्पूनबिर्याणी मसाला(ऐच्छिक)
  10. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनकिचनकिंग मसाला
  12. 1 टीस्पूनब्याडगी मिरची तिखट
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 1/4 टीस्पूनहिंग
  15. मीठ चवीनुसार
  16. 1/2 कपपाणी
  17. 2 डावतेल
  18. 2 टीस्पूनकोथिंबीर चिरुन

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    मशरुम पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून घ्यावेत. माती निघून येते.मशरुम उभे चिरावेत.बेबीकॉर्न धुवून अंदाजे तुकडे करावेत. व मायक्रोवेव्ह मध्ये 80°वर 7-8 मिनिटे उकडून घ्यावेत. इतर लागणारे सर्व साहित्य तयार ठेवावे.

  2. 2

    कांद्याचे उभे काप करावेत.टोमॅटोच्या फोडी कराव्यात. मिक्सरमध्ये कांद्याचे काप,काजू,लसूणपाकळ्या यांची ग्रेव्ही करावी.टोमॅटोची प्युरी करावी.

  3. 3

    कढईत तेल तापवून त्यात हिंग, मीरे,तमालपत्रं घालावीत.त्यावर कांद्याची ग्रेव्ही घालून 4-5मिनिटे परतावे. यावर टोमॅटोची प्युरी घालावी.तेल सुटेपर्यंत परतावे. दुसऱ्या
    एका कढईत थोडेसे तेल घालावे.त्यावर धुतलेले मशरुम घालावेत.परतावे.5मिनिटांनी पाणी सुटू लागते.यातील पाणी आटेपर्यंत हलवावे.3-4मिनिटांनी पाणी आटते आणि मशरूम मऊ आणि छोटे दिसू लागतात.कढईतून काढून घ्यावे.

  4. 4

    ग्रेव्ही परतून तयार आहे.यात बिर्याणी मसाला(यात खडा मसाला आणि धणे जीरेपूड असते म्हणून वापरून पाहिला....मस्त चव आली) किचनकिंग मसाला, गरम मसाला,हळद,तिखट,मीठ घालावे. पाणी घालून ग्रेव्हीला उकळी येऊ द्यावी.

  5. 5

    आता यात उकडलेले बेबीकॉर्न व मशरुम घालावेत व हलवावे.5-7मिनिटांनी गँस बंद करावा.

  6. 6

    मशरुम-बेबीकॉर्न व्हेज करी तयार आहे. यावर कोथिंबीर गार्निश करुन रोटी,फुलका किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes