कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैरी साल काढून वाफवून घेतली मग थंड झाल्यावर त्यातील गर काढून घेतला त्यात बेसन पीठ व थोडे पाणी मिक्स केले.
- 2
आता गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीर, मेथ्या, कढीपत्ता, मिरच्या, हिंग व हळद यांची फोडणी करून घेतली. त्यात आलं, धणेपूड व थोडे तिखट मिक्स केले.
- 3
त्यात वरील कैरी व बेसनाचे मिश्रण ओतून गुळ व मीठ घालून व गरजेनुसार पाणी घालून कैरीची कढी पाच-सात मिनिट उकळून घेतली.
- 4
तयार कैरीची कढी काढून सर्व्ह केली. हि कढी भाताबरोबर छान लागते. किंवा गरम गरम प्यायलाही छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
#KRRकैरी रेसिपीजयासाठी मी कैरीची कढी केली आहे. उन्हाळा म्हटला तर कैरी हवीच. कैरीचे विविध प्रकार आपण करतो. उन्हाळ्यात आंबट-गोड चवीचे काहीतरी खावसं वाटतं.चटकदार, आंबट, गोड, तिखट अशी कैरीची कढी.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
कैरीची कढी (kairichi kadhi recipe in marathi)
#cooksnapकैरीची कढी अंजली भाईक यांची..अंजली भाईक यांची मी कैरीची कढी cooksnap केली आहे. अंजली ताई यांच्या सर्वच रेसिपी खूप छान आणि वेगळ्या असतात... त्यातलीच हि कैरीची कढी.. ही मी पहिल्यांदाच करुन. बघीतली... आणि एकदम फकड झाली कि हो... मस्त..घरातील सर्वाना आवडली... आणि मला ही... खूप छान टेस्टी झाली.. 😋😋👍🏻👍🏻 Vasudha Gudhe -
कढी भेळ (kadhi bhel recipe in marathi))
#ks8स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रनाशिक चे प्रसिद्ध स्ट्रीट फूड कढी भेळ. Sumedha Joshi -
कैरीची लौजी (Kairichi Launji Recipe In Marathi)
#कैरीया सीझनमध्ये कैरीचे लुंजी ही खूप छान लागते जेवणातून तयार करून घेतलीच पाहिजे जेवणाची चव येते जेवण नही जाते उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारच्या कैरीची लुंजी ही एकदा तयार करून ठेवली तर आठवडाभर लुंजी जेवणातून घेता येते तर नक्कीच ट्राय करून बघा कैरीची लुंजी रेसिपी. Chetana Bhojak -
-
कढी पकोडे (Kadhi Pakode Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ बनवण्याची एक वेगळीच पद्धत असते यामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे ही खूपच प्रसिद्ध रेसिपी पंजाब मध्ये प्रत्येक घराघरात बनवली जाते याची पद्धतही थोडी वेगळी आहे चला तर मग आज आपण बघुयात कडी पकोडे . हा पदार्थ पंजाबी जेवण मध्ये सर्रास पाहण्यात येतो. Supriya Devkar -
-
आंब्याची (कैरीची) कढी (ambhyachi kadhi recipe in marathi)
#cooksnap आंब्याची कढी ही Suchita Ingole Lavhale Tai यांची रेसिपी cooksnap केलेली आहे. खूपच टेस्टी झालेली आहे, ताई कढी. Priya Lekurwale -
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
कैरीची कढी आंबट-गोड चवीची कढी आहे तोंडाला रुची देणारी तोंडाची चव वाढवणारी कढी आहे Priyanka yesekar -
कैरीची आंबट गोड करी (वरण) (Kairichi Curry Recipe In Marathi)
भाजी/करी कुकस्नॅप रेसिपीकैरीची आंबट गोड करीप्रिती साळवी ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. खुपचं छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
-
-
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
आज सकाळी सकाळी भाजी वाल्या कडे कैरी मिळाली.ती फारशी आंबट नसल्याने गोड तिखट चटणी बनविली.बघा कशी झालीय! Pragati Hakim -
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
#GA4#week7#खरे तर मी नेहमी कढी करताना दह्याचा वापर करते. परंतु आज मात्र दह्या ऐवजी ताकाचा वापर करून कढी बनवलेली आहे ...वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची कढी बनविल्या जाते.. परंतु मी करीत असलेली कढी ची कृती आज तुमच्यासमोर ठेवते... Varsha Ingole Bele -
फजेतो....गुजराथी मँगो कढी(fajeto gujarati mango kadhi recipe in marathi)
आंब्याच्या सीझन मध्ये वेगवेगळे आंब्याचे पदार्थ नक्कीच ट्राय करायचे. फजेतो हा गुजराथी मँगो कढीचा चवदार प्रकार. गरम गरम भातासोबत आंबट गोड तिखट चवीची ही कढी अप्रतिम लागते. Preeti V. Salvi -
भेद्र्याची कढी (bhedryachi / Tomato chi kadhi recipe in marathi)
#KS3 "विदर्भ" हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे. 'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती. विदर्भाचा इतिहास असा खूपच प्राचीन आहे. त्या विदर्भातील पारंपरिक पदार्थ आज आपण पाहणार आहोत.. नाव जरी थोडं विचित्र असलं तरीही हा एक अस्सल विदर्भीय गावाकडचा पदार्थ आहे. खूप झटपट, दही/डाळ यांच्याशिवायचा आणि साध्याशा गोष्टींनी बनणारा असल्याने विदर्भातील खेडोपाडी बनतोच बनतो! भेद्रे म्हणजे देशी / जवारी टोमॅटो! ते आपल्या नेहमीच्या टोमॅटोंपेक्षा छोटे, खूप लाल नसलेले, जरा जास्त आंबट आणि मऊ असतात... मी इथे आपले नेहमीचेच टोमॅटो वापरले आहेत.. आंबटपणा वाढविण्यासाठी तुम्ही थोडी आमचूर पावडर वापरु शकता.. पण, पारंपरिक पद्धतीमध्ये टोमॅटोचाच वापर असतो.. ही रेसिपी थोडी दाक्षिणात्य टोमॅटो रस्सम किंवा सिंधी कढी शी साधर्म्य दाखवते.. तुम्हांला नक्कीच आवडेल.. शर्वरी पवार - भोसले -
-
कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Gital Haria यांची रेसिपी आज मी cooksnap केलेली आहे.या पदार्थांचे महाराष्ट्रीयन नाव"मेथी आंबा" असेही आहे. म्हणून मी थोडे मेथी दाणे घालून फोडणी दिलेली आहे. Priya Lekurwale -
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,माझी 1 रेसीपी आहे, कडी ही जवळपास सर्वांनाच आवडते, मलाही खूप खूप आवडते, माझ्या कडे हप्ता मध्ये २ दा तर नक्कीच होत असते चला तर बघुया कडी कशी करावी Jyotshna Vishal Khadatkar -
कांदा कैरीची चटणी...मराठवाडा स्पेशल (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5उन्हाळा स्पेशल मराठवाड्यातला रेसिपी.एकदम चटकदार ..वरून खमंग फोडणी ही मराठवाड्याची खासियत. Preeti V. Salvi -
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
मराठवाडा स्पेशल कढी (kadhi recipe in marathi)
#KS5 मराठवाडा म्हटलं धुळे, जालना परभणी हा भाग आठवतो या भागात काही वेगळे पदार्थ आहेत जे आपला ठसा ऊमटवतात त्यात सुशिला,निलंगा भात, बोरिवरी वरण असे पदार्थ येतात. इकडे कढी, कढीगोळे ही बनवले जातात पण इकची कडी काहीशी तिखट असते.चला तर मग बनवूयात कढी Supriya Devkar -
-
कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#कांदा कैरीची चटणी Rupali Atre - deshpande -
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
आज आईला कैरीची चटणी करायची होती. आमच्याकडे मोठ्या माणसांना कैरी वर्ज्य आहे health precautions मुळे म्हणून बहुतेक वेळा तिची चटणीच केली जाते. मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी #cooksnap केली आहे. त्यात बदल म्हणजे मी साखर नाही वापरली आहे आणि कोथिंबीर सुध्दा नाही वापरली . Bhakti Chavan -
-
कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#KRRखास चैत्रात केला जाणारा,चैत्रगौरीसाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीची डाळ.हरभऱ्यात मुळातच पोषणमूल्य भरपूर असतात.चैत्रगौरीसाठी हरभऱ्याची उसळ केली जाते,त्याबरोबरच ही आंबट,तिखट,गोडसर अशा चवीची डाळ....आंबेडाळ किंवा कैरीची डाळ हमखास केली जाते.उन्हाची काहिली चैत्रमासात खूप त्रासदायक असते.इकडे अन्नपूर्णा गौर चैत्रात माहेरपणासाठी येते असे मानले जाते.तिला तांदळाच्या राशीवर चांदीच्या वाटीमध्ये झुल्यावर बसवून तिला दागिने घालून आरास केली जाते.चैत्र शु.तृतीया ते अक्षय्यतृतिया अशी ही माहेरवाशीण चांगली महिनाभर मुक्काम करते.मग तिच्यासाठी रोज मोगऱ्याचा मन सुगंधी करणारा गजरा,कधी मादक सुवासाचा सोनचाफा अर्पण केला जातो.इतके गोड दृष्य असते चैत्रगौरीचे.अगदी मनात साठवुन ठेवावे असे!पाडव्याची गुढीची गाठी घालून झुला सजवला जातो.रोज काहीतरी गौरीसाठी गोड साखरांबा,गुळांबा,श्रीखंड,आम्रखंड, कैरीचं पन्हं, खीर,पुरणपोळी,आमरस अशी रेलचेल असते.चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी मग माहेरून बोळवण करताना कानवले,बेसनाचे लाडू,कलिंगड, खरबूज तसंच कैरीची डाळ,पन्हं अर्पण केले जाते.मैत्रिणींसमवेत अत्तर,गुलाबपाणी यांची उधळण करत वातावरणात मंद सुवास,थंडावा निर्माण केला जातो.मनमोहक टपोरे मोगऱ्याचे गजरे तर यावेळी हवेतच!!एकूण काय,आपल्या पूर्वजांनी उन्हाळा सुसह्य व्हावा,सर्वांनी एकत्र जमावे,थोडी मौज करावी,सुखदुःख वाटावी या करताच हे निमित्त योजलेले असावे.आता काळाच्या ओघात व धावपळीच्या जीवनात एक दिवस देवाच्या निमित्ताने तरी एक उर्जा देणारा असा गाठीभेटीचा,हळदीकुंकवाचा कार्यक्रम नक्कीच सुखावह ठरु शकतो🤗या मग मैत्रिणींनो चैत्रगौरीचं हळदीकुंकू घ्यायला.सोबत डाळ,पन्हं घ्यायला😊🤗♥️🙏🙏 Sushama Y. Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16279428
टिप्पण्या