घोळ ची भाजी (Ghol Chi Bhaji Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#हिरव्या रंगाच्या रेसिपीज

घोळ ची भाजी (Ghol Chi Bhaji Recipe In Marathi)

#हिरव्या रंगाच्या रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 जुडी चिगळ (घोळ)
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. १०-१२ पाकळ्या लसूण ठेचून
  4. 3 टेबलस्पूनबेसन
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चीरलेली
  6. १ १/२ टेबलस्पून तेल
  7. 1/2 टिस्पून मोहरी
  8. 1/2 टिस्पून जीरे
  9. 1/4 टिस्पून हळद
  10. 1/4 टिस्पून हिंग
  11. 1 टिस्पून तिखट
  12. 1/2 टिस्पून गरम मसाला
  13. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम घोळाची भाजी निवडून काड्या काढून स्वच्छ दोन-तीन पाण्याने धुऊन घेतली. मग थोडी चिरून घेतली. बेसन भाजून घेतले.

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जीरे, हिंग, हळद, ठेचलेला लसूण घालून परतून घेतले. मग कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतले. मग त्यात चिरलेली घोळाची भाजी घालून परतले.

  3. 3

    आता त्यात तिखट, मीठ व गरम मसाला मिक्स केला. मीठ घातल्याने भाजीला पाणी चांगले सुटते. नंतर त्यात भाजलेले बेसन मिक्स करून परतले.

  4. 4

    भाजी चांगली वाफवून घेतली. भाजी बाऊलमध्ये काढून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes