चमचमीत एग बिर्याणी

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

चमचमीत एग बिर्याणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीबासमती तांदूळ धुऊन निथळत ठेवलेला
  2. 6अंडी उकडलेली त्याची सालं काढून काप करून त्याला तेलामध्ये थोडं तिखट हळद घालून फ्राय करून ठेवलेली
  3. 2टोमॅटो दहा लसूण दीड इंच बारीक वाटलेलं
  4. 6कांदे उभे पातळ चिरलेले
  5. 15काजू,15 बदाम पाव वाटी किसमिस
  6. 1 टेबलस्पूनतेल एक टेबलस्पून साजूक तूप
  7. 8मिरी दोन वेलची दोन दालचिनी दोन चक्री फुल दोन लवंग दोन तमालपत्र
  8. 1 वाटीघट्ट दही
  9. तुमचा हळद दीड चमचा तिखट अडीच चमचे शाही बिर्याणी मसाला
  10. तळण्यासाठी तेल
  11. चवीनुसारमीठ
  12. 1मोठी वाटी पुदिना व कोथिंबीर धुवून बारीक चिरून ठेवलेले

कुकिंग सूचना

50मिनिट
  1. 1

    प्रथम तेल गॅसवर ठेवून त्यामध्ये कापलेल्या कांद्यापैकी तीन चतुर्थांश कांदा थोडंसं मीठ साखर घालून छान सोनेरी रंगावर तळून घ्यावा त्यातच काजू व बदाम तळावेत व किसमिस तळावेत व बाजूला ठेवावेत

  2. 2

    एका फ्राय पॅनमध्ये थोडं तेल आणि तूप घालून खडे मसाले घालावे व उरलेला कांदा घालावा तो छान सोनेरी झाला की त्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालून उकळी आली की मीठ घालावे व धुवून ठेवलेला तांदूळ घालून छान सुटसुटीत मोकळा भात शिजवून घ्यावा व तो थंड करत ठेवावा मग त्यातच पुदिना कोथिंबीर व तळून ठेवलेला कांदा व ड्रायफ्रूट्स थोडे बाजूला ठेवून बाकी सगळे मिक्स करावे

  3. 3

    आता एका कढईमध्ये उरलेलं तेल तूप घालून त्यामध्ये वाटलेला मसाला घालावा टोमॅटोचा मग त्यामध्ये हळद तिखट व बिर्याणी मसाला घालून छान परतावे तेल सुटू लागल्यावर परततच त्यात दही घालावे मीठ घालावे थोडसं कोथिंबीर व मीठ घालून छान परतावे व त्यामध्ये अंडी घालून फ्राय करून घ्यावे

  4. 4

    आता भात केलेल्या भांड्यातून तळाला थोडाफार ठेवून बाकी भात काढून घ्यावा त्यामध्ये हा मसाला केलेले अंडी त्यावर लेयर घालून थोडसं मीठ व बिर्याणी मसाला भुरभुरावा व उरलेला भात त्यावर घालून काढून ठेवलेले तळलेले कांदे व काजू ड्रायफ्रूट्स त्यावर घालावे कोथिंबीर पुदिना सगळं घालून झाकण ठेवून मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटे ठेवून गॅस बंद करावा
    बिर्याणी अतिशय टेस्टी व चमचमीत होते ही आपण नुसतीच खाऊ शकतो किंवा दही खांद्याबरोबर खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes