उपवासाची स्टफ इडली (Upvasachi Stuff Idli Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#CHOOSETOCOOK
#माझी आवडती रेसिपी.

उपवासाची स्टफ इडली (Upvasachi Stuff Idli Recipe In Marathi)

#CHOOSETOCOOK
#माझी आवडती रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपभगर (वरई राईस)
  2. 1/4 कपसाबुदाणा
  3. 1 कपदही
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 कपपाणी
  6. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  7. भाजी साठी.. १ रताळ
  8. 1/2 मेजरींग कप तांबड्या भोपळ्याच्या फोडी
  9. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  10. 1/2 टिस्पून जीरे
  11. 2 टिस्पून काश्मिरी लाल तिखट
  12. 1/2 टिस्पून जीरे पावडर
  13. 1/2 टिस्पून काळी मीरी पुड
  14. मीठ चवीनुसार
  15. कोथिंबीर उपवासाला खात असल्यास

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    प्रथम भगर व साबुदाणा दोन्ही मोजून पथम साबुदाणा रवाळ वाटून मग त्यातच भगर घालून इंचरवर रवाळ वाटून घेतले. कारण दोन्ही एकाच वेळी घातल्यास साबुदाणा रवाळ होईपर्यंत भगरीचे पीठ होऊन जाईल व आपल्याला रवाळ मिश्रण पाहीजे.

  2. 2

    आता एका वाडग्यात वरील मिश्रण घालून त्यात फेटलेले दही मीठ व पाणी घालून बॅटर तयार केले आणि पाच सात मिनिट फेटून घेतले व 20 मिनिट झाकून ठेवले.

  3. 3

    आता भाजी तयार करण्यासाठी रताळ व तांबडा भोपळा स्वच्छ धुऊन साल काढून बारीक चिरून घेतले. मग गॅसवर पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीरे घालून फोडणी केली मग दोन्ही भाज्या घालून परतून झाकण ठेवून वाफ आणली.

  4. 4

    नंतर त्यात तिखट, काळ मीठ जिरेपूड सर्व मिक्स करून थोडं पाणी घालून वाफवून घेतले.

  5. 5

    आता इडलीपात्रात पाणी गरम करत ठेवले. इडली च्या बॅटर मध्ये बेकिंग सोडा घालून त्यावर किंचित पाणी घातले व हलक्या हाताने फेटून घेतले. व इडली स्टँड ग्रीसिंग करून त्यात वरील बॅटर थोडे थोडे घालून मग प्रत्येक साच्यात वरील सारणाचे छोटे छोटे चपटे गोळे प्रत्येक साच्यात ठेवून वरून परत इडलीचे बॅटर ओतले व अशाप्रकारे तयार केलेला स्टॅन्ड इडलीपात्रात ठेवून इडल्या वाफवून घेतल्या.

  6. 6

    वफवलेल्या इडल्यांची वाफ गेल्यावर त्या सुरीने काढून घेऊन चटणीबरोबर सर्व्ह केल्या अतिशय स्पंजी होतात व चवीलाही छान लागतात तसेच भाज्या घातल्यामुळे त्या हेल्दी पण होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes