हादग्याच्या फुलांची भजी/अगस्तीच्या फुलांची भजी (Hadgyachya Fulanchi Bhajji Recipe In Marathi)

#WWR रानभाजी प्रकारातली ही फूले थंडीत मोठ्याप्रमाणात मिळतात. याची भाजी तसेच भजी खूप छान चवीची असतात. झटपट बनता येते असे भजी आपण बनवणार आहोत.

कुकिंग सूचना
- 1
हादग्याची फुले घेऊन त्याचे पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात नंतर त्या पाकळ्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात आता भज्याचे बॅटर बनवण्याकरता बेसन पीठ तांदळाचे पीठ एका बाऊलमध्ये घ्यावे
- 2
त्यानंतर त्यात हळद मीठ लाल तिखट धणे जीरे पूड ओवा घालून घ्यावे सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
- 3
आता त्यात पाणी घालून पीठ सरसरीत भिजवावे जेणेकरून आपल्याला त्यात पाकळ्या भिजवून तळता येतील पीठ दहा मिनिटे भिजले की तेल गरम करावे आणि पाकळ्या पिठात चांगल्या भिजवून बुडवून नंतर त्या तेलात तळाव्यात भजी छान दोन्ही बाजूने खरपूस तळावेत
- 4
तयार आहेत आपली हादग्याच्या फुलांची भजी. ही भजी तुम्ही कोरडी किंवा टोमॅटो सॉस सोबत किंवा चिंचेची चटणी सोबत खाऊ शकता
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या