मटार करंजी (matar karanji recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#hr आपल्या रोजच्या आहारात तेलकट - तुपकट पदार्थांचे प्रमाण थोडे कमीच असावेत. तरीही आपण विशिष्ट कारणाने, समारंभाने लोकांना जेवायला घरी बोलवत असतो. तेव्हा मुख्य पदार्थाबरोबर साईड - डिश म्हणून चटकदार तळलेला पदार्थ करतो. त्यापैकीच ही रेसिपी..

मटार करंजी (matar karanji recipe in marathi)

#hr आपल्या रोजच्या आहारात तेलकट - तुपकट पदार्थांचे प्रमाण थोडे कमीच असावेत. तरीही आपण विशिष्ट कारणाने, समारंभाने लोकांना जेवायला घरी बोलवत असतो. तेव्हा मुख्य पदार्थाबरोबर साईड - डिश म्हणून चटकदार तळलेला पदार्थ करतो. त्यापैकीच ही रेसिपी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  1. सारण
  2. 1 वाटीमटार,
  3. 4-5हिरव्या मिरच्या,
  4. 2 टेबलस्पूनओले खोबरे,
  5. 1कांदा
  6. 1मूठ चिरलेली कोथंबीर,
  7. 2 टेबलस्पूनओले खोबरे
  8. 1 टेबलस्पूनखसखस,
  9. 1 टेबलस्पूनआले - लसूण पेस्ट,
  10. 1/2 टीस्पून साखर, मीठ
  11. कव्हर
  12. 2 वाट्यागव्हाचे पीठ, आवश्यकतेनुसार पाणी,
  13. मीठ, हळद, तेल,

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद व 2 tbs तेलाचे मोहन घालून कणिक घट्ट भिजवून ठेवावी. त्यानंतर मिरच्या, कोथंबीर, खोबरे, वाटून घ्यावे, खसखस भाजून वाटून घ्यावी.

  2. 2

    थोडया तेलात कांदा बदामी रंगापर्यंत परतून घ्यावा. त्यात मटार व चिमूटभर मीठ घालून शिजवून घ्यावेत. मटारचे दाणे शिजल्यावर त्यात सर्व वाटलेल्या वस्तू घालाव्यात व हलवून झाकण ठेऊन एक वाफ आणावी. नंतर खाली उतरवून साखर घालून सारण थंड होऊ द्यावे.

  3. 3

    कणकेच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून, त्यात मटाराचे सारण भरून करंज्या तयार कराव्यात व तळाव्यात. गरम गरम सर्व्ह करा मटार करंजी. 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

Similar Recipes