टेस्टी पालक पनीर मटार सब्जी (Palak Paneer Matar Sabji Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#DR2
#डिनर रेसिपिस # रात्रीच्या जेवणात थोडी पचायला सोप्पी अशी भाजी मी बनवली आहे. सोबत पोळ्या, भात चला तर रेसिपी बघुया

टेस्टी पालक पनीर मटार सब्जी (Palak Paneer Matar Sabji Recipe In Marathi)

#DR2
#डिनर रेसिपिस # रात्रीच्या जेवणात थोडी पचायला सोप्पी अशी भाजी मी बनवली आहे. सोबत पोळ्या, भात चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. १५० ग्रॅम पालक
  2. ३० ग्रॅम मटार
  3. ४० ग्रॅम पनीर
  4. 2कांदे
  5. 2टोमॅटो
  6. 1 टिस्पुनजीरे
  7. 1 टेबलस्पुनआलेलसुण ठेचा
  8. 1/4 टिस्पुनहळद
  9. 1 टिस्पुनधनेजिरे पावडर
  10. 1/2 टिस्पुनगरम मसाला
  11. 1 टिस्पुनसाखर
  12. 2 टिस्पुनदही
  13. 1 टेबलस्पुनक्रिम
  14. चविनुसारमीठ
  15. 1 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    पालक पनीर मटार सब्जी बनवण्यासाठी पूर्व तयारी करून ठेवा. कांदा, टोमॅटो, अर्धापालक चिरून ठेवा. अर्धापालक ब्लांच करून पेस्ट करून ठेवा. आले लसुण बारीक करून ठेवा

  2. 2

    मटार गरमपाण्यात५ मिनिटे वाफवुन घ्या तुपावर किंवा तेलावर पनीर परतुन घ्या

  3. 3

    कढईत तेल गरम झाल्यावर जीरे व आलेलसुण ठेचा परतुन त्यात चिरलेला कांदा परतुन घ्या गोल्डन होई पर्यंत नंतर त्यात टोमॅटो व थोडे मीठ मिक्स करून शिजवुन घ्या त्यातच पावडर मसाले हळद, तिखट, धनेजिरे पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी मिक्स करा व परता २-४ मिनिट स्लो गॅस वर झाकण ठेवा

  4. 4

    नंतर त्यात मटार व चिरलेला पालक मिक्स करा व परता दही मिक्स करा नंतर पालक प्युरी मिक्स करा

  5. 5

    सर्व भाजी परतुन शिजवा चविनुसार मीठ व थोडी साखर मिक्स करा शेवटी त्यात पनीरचे परतलेले पिस मिक्स करा थोडे वरून डेकोरेट करण्यासाठी बाजुला ठेवा

  6. 6

    शेवटी त्यात आवडीनुसार क्रिम मिक्स करा आपली भाजी रेडी

  7. 7

    प्लेटमध्ये पालक पनीर मटार सब्जी गरमागरम वरून पनीर व क्रिम ने डेकोरेट करून रोटी, पोळी लिंबाची फोड सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes