उपवासाची आमटी(aamti recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

बरेचदा उपासाच्या फराळा सोबत तोंडी लावायला किंवा रसरशीत काही तरी हवं असतं ,आपण दही ,ताक ,बटाट्याची कोशींबीर ,असं बरेचदा घेतोच पण कधीतरी हि आमटी करावी ,एक वेगळीच लज्जत येते..

उपवासाची आमटी(aamti recipe in marathi)

बरेचदा उपासाच्या फराळा सोबत तोंडी लावायला किंवा रसरशीत काही तरी हवं असतं ,आपण दही ,ताक ,बटाट्याची कोशींबीर ,असं बरेचदा घेतोच पण कधीतरी हि आमटी करावी ,एक वेगळीच लज्जत येते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
दोन
  1. 1 कपभिजवलेले शेंगदाणे
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 250 मिलिलिटर आंबट ताक
  4. 1 इंचआले
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 7 ते 8कढीपत्त्याची पाने
  7. 1 टी स्पूनमीठ आवश्यकतेनुसार कमी-जास्त करू शकतो
  8. 1 टीस्पूनजिरे
  9. 1 टीस्पूनसाखर
  10. 1 टीस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य तयार ठेवून मिरची आले जिरे व मीठ सरबरीत कुटून वेगळे ठेवावे.बटाटे सोलून मिक्सर च्या पॉट मध्ये शेंगदाण्यां सोबत एकत्र घ्यावे.

  2. 2

    शेंगदाणे व बटाटे एकत्र मिक्सर मधून वाटून घ्यावे,वाटतानाच साखर ऍड करावी.आता कढईमध्ये थोडेसे तूप घालावे.या आमटीला तूपकट पणा येऊ नये म्हणून मुद्दाम कमी तूपाचा वापर केला आहे.तूप गरम झाल्यावर आलं,मिरची,जिऱ्याची पेस्ट व कढीपत्ता घालावा.तो परतल्यावर शेंगदाणे बटाट्याची पेस्ट ऍड करावी व दोन-तीन मिनिट हलवत रहावे.

  3. 3

    वरील मिश्रण तुपामध्ये खमंग भाजल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालावे व छान उकळ्या येऊ द्याव्या,पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. उपासाचे आमची तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes