साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#फोटोग्राफी
#खिचडी
आज मी मायक्रोवेव्ह मध्ये खिचडी बनविली, एकदम झटपट होते फक्त बटाटे मी गॅसवर फ्राय करून घेतले. मायक्रोवेव्ह वर शिजवताना १५० तापमानावर शिजवा.

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

#फोटोग्राफी
#खिचडी
आज मी मायक्रोवेव्ह मध्ये खिचडी बनविली, एकदम झटपट होते फक्त बटाटे मी गॅसवर फ्राय करून घेतले. मायक्रोवेव्ह वर शिजवताना १५० तापमानावर शिजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ जण
  1. २०० ग्राम साबुदाना
  2. 1/2 कपभाजलेल्या शेंगदाण्याचे कुट
  3. 3हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  4. 1 टीस्पूनजिरे
  5. 1 टीस्पूनसाखर
  6. चवीनुसारमीठ
  7. 1बटाटा
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. सजावटीसाठी ओले खोबरे
  10. 1लिंबूची फोड

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटा बारीक पातळ काप करून घ्या व ते थोड्या तेलात फ्राय करून घ्या फ्राय करताना तेलात चिमूठभर मीठ टाका. फ्राय झाले की डिशमध्ये काढा.

  2. 2

    मायक्रोवेव्ह प्रूफ काचेच्या भांड्यात तेल, जिरे, हिरवी मिरची घालून २ मिनिटे मायक्रोवेव्ह करा. तोपर्यंत भिजवलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याचे कुट, साखर, मीठ घालून मिक्स करा.

  3. 3

    आता त्यात साबुदाण्याच मिश्रण घालून एकजीव करा व परत मायक्रोवेव्ह मध्ये ३ मिनिटे शिजवा. काढून ढवळा.

  4. 4

    परत २ मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये शिजवा. काढून डिशमध्ये सर्व्ह करताना फ्राय केलेला बटाटा व ओले खोबरे पेरा, लिंबू पिळून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes