सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#रेसिपीबुक #week14
#अळूवडी
अळूवडी सर्वांची अतिशय आवडीची...
पण अळूवडी म्हटले कि अगदी सुगरणीचेच काम ..पण मला तर वाटतं की अळूवडी करणे खूप सोपे आहे..वरवर जरी कठीण वाटत असले तरी ...
फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अळूवडी करणे एकदम सोपे..एकतर अळूची पाने फार जुन नको.दुसरे म्हणजे dark brown कलरचे देठ असलेले पाने घ्यायची.
आणि वडी तळल्यावर कुरकुरित लागली पाहिजे.
चला तर मग बघुया सात्विक अळूवडी ची रेसिपी...

सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14
#अळूवडी
अळूवडी सर्वांची अतिशय आवडीची...
पण अळूवडी म्हटले कि अगदी सुगरणीचेच काम ..पण मला तर वाटतं की अळूवडी करणे खूप सोपे आहे..वरवर जरी कठीण वाटत असले तरी ...
फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अळूवडी करणे एकदम सोपे..एकतर अळूची पाने फार जुन नको.दुसरे म्हणजे dark brown कलरचे देठ असलेले पाने घ्यायची.
आणि वडी तळल्यावर कुरकुरित लागली पाहिजे.
चला तर मग बघुया सात्विक अळूवडी ची रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 10ते 12 अळूची मोठी पाने
  2. 2 वाटीचणा डाळ पिठ
  3. 2 चमचेतांदळाचे पिठ
  4. 1/2 वाटीभिजवलेल्या चिंचेचा कोळ
  5. 1/2 वाटीकिसुन गुळ
  6. 1 चमचातिखट
  7. 1/2 चमचाधणे
  8. 1/2 चमचाजिरे पूड
  9. चविनुसारमीठ
  10. 1/2 चमचाहळद
  11. तळण्याकरीता तेल
  12. 2 चमचेमोहन साठी तेल
  13. 1 चमचाआले मिरची पेस्ट

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पाने स्वच्छ धुवुन घ्यावी.

  2. 2

    एका परातीत चणा डाळ पिठ त्यात चिंच कोळून त्यात गुळ,मीठ.तिखट,हळद,आले मिरची पेस्ट,तांदळाचे पिठ घाला.

  3. 3

    नंतर त्यात थोडे पाणी घालुन सगळे एकत्र करुन पिठ कालवावे.त्यात दोन चमचे गरम तेल मोहन म्हणून घालावे.

  4. 4

    आता अळुचे पान पसरवून घ्यावे.त्या पानावर कालवलेले पिठ पसरून लावावे.त्यावर दुसरे अळूचे पान ठेऊन पिठ पसरवून घ्यावे.अशीच एकावर एक ४ते५ पाने ठेवावी.व आता या पानांची गुंडाळी करुन घ्यावी.

  5. 5

    वरील प्रमाणे उरलेल्या पानाचे पण करावे.आता या दोन्ही गुंडाळ्या कूकरमधे किंवा मोदकपात्रात उकडवून घ्याव्या.

  6. 6

    उकडवुन झाल्यावर व गार झाल्यावर वड्या कापुन घ्याव्या.आणि नंतर तेलात खुसखुशित तळुन घ्याव्या.गरम गरम घ्याव्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (6)

Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
सुप्रिया तुझी सात्विक आळुवडी करून बघितली( कुकस्नॅप) खुप मस्त टेस्टी झाली👌
धन्यवाद सुप्रिया🙏

Similar Recipes