ओट्स डोसा (oats dosa recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#GA4 #week7 ओट्स आणि ब्रेकफास्ट हे किवर्ड ओळखून मी आज ओट्सचे डोसे केलेत.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रीय घरांमध्ये मऊभात, मेतकूट, तूप, पापड किंवा पोहे, सांजा, थालीपीठ, धिरडी असा नाश्ता असायचा. माणसं आरोग्याच्या दृष्टीनं जागरूक झाल्यावर आणि परदेशाचं वारं आपल्याकडे आल्यावर ‘ब्रेकफास्ट सिरीयल्स’चा जमाना आला. त्यात कॉर्नफ्लेक्सनं बाजी मारली होती; पण अलिकडे मात्र ओटमील, रोल्ड ओट्स वगैरे खाण्याकडे अनेकांचा कल दिसतो. हे ‘ओट्स’ म्हणजे काहीतरी मॉडर्न असं अनेकांना वाटतं. पण तसं नाही, ‘ओट्स’ म्हणजे मराठीत ‘जव’.
‘अवेना सतीवा’ असं शास्त्रीय नाव असलेले ‘ओट्स’. इजिप्तमधील उत्खननात ख्रिस्तपूर्व २000 मधील अवशेषात सापडले आहेत.
इतर धान्यांच्या कणसात जसे साल असलेले दाणे असतात, तशीच रचना ओट्सच्या बाबतीतही असते. ओट्सच्या दाण्यांना ओटग्रोट्स असं म्हणतात. हे दाणे दळून केलेल्या पिठाला ‘ओटमील’ असं म्हणतात. ओटमील आणि ओटब्रॅन म्हणजे ओट्सवरचा कोंडा. यांची खासियत म्हणजे त्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेला चोथा भरपूर प्रमाणात असतो. यापैकी निम्मा चोथा पाण्यात विरघळणारा आणि उरलेला निम्मा न विरघळणारा असतो. पाण्यात विरघळणार्‍या चोथ्यामध्ये बीटा ग्लुकॅन्स नावाचा घटक असतो, ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विघातक कोलेस्टेरॉल कमी होतं आणि चांगलं मात्र तसंच राहतं. ओटमीलमध्ये असाही घटक आहे, ज्यामुळे त्याला अँण्टिऑक्सिडंट हा गुणधर्म प्राप्त होतो. असे एक ना अनेक गुणधर्म असलेल्या ओट्सचा आहारात नक्की समावेश करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटं
४ सर्व्हिंगज
  1. 3/4 कपओट्स
  2. 1/2 कपतांदळाचं पीठ
  3. 1/4 कपरवा
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 टीस्पूनमिरेपुड
  6. 1 टीस्पूनचाट मसाला
  7. 2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  8. 2 टीस्पूनचिरलेल्या कोथिंबिरीच्या काड्या
  9. 2 टीस्पूनचिरलेली कढीपत्त्याची पानं
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. 1चिरलेला कांदा
  12. आवश्यकतेनुसार पाणी
  13. चवीनुसारमीठ
  14. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

३० मिनीटं
  1. 1

    ओट्स भाजून ते गार झाल्यावर त्याची मिक्सरमधे पावडर करुन घेणे. त्यात तांदळाचं पीठ आणि रवा घालणे.

  2. 2

    तिन्ही मिक्स करुन त्यात जीरे, मिरेपुड, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, हिंग, कोथिंबिरीच्या काड्या, कढीपत्ता, कांदा आणि मीठ घालून सर्व एकत्र करुन घेणे. मग त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून २० मिनीटे भिजवून ठेवणे.

  3. 3

    २० मिनीटांनंतर तव्यावर तेल घालून डावाने तयार मिश्रण पसरवून डोसे घालणे व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणे. टोमॅटो साॅस किंवा चटणी बरोबर खायला तयार ओट्सचे डोसे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes