दाल तडका (daal tadka recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#लंच
#साप्ताहिक_लंच_प्लॅनर
#गुरुवार_दाल_तडका

प्लॅनर रेसिपी बनवताना खुप छान वाटते.. विचार करत बसायला नको..ठरलेल्या रेसिपीज बनवायच्या असतात त्यामुळे रोज वेगवेगळ्या पद्धतीने आवर्जून रेसिपी बनवली जाते..

दाल तडका (daal tadka recipe in marathi)

#लंच
#साप्ताहिक_लंच_प्लॅनर
#गुरुवार_दाल_तडका

प्लॅनर रेसिपी बनवताना खुप छान वाटते.. विचार करत बसायला नको..ठरलेल्या रेसिपीज बनवायच्या असतात त्यामुळे रोज वेगवेगळ्या पद्धतीने आवर्जून रेसिपी बनवली जाते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार जणांसाठी
  1. 1 कपतुरडाळ
  2. 1/2 कपमुगडाळ
  3. 10बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून
  4. 2हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या
  5. 2सुक्या लाल मिरच्या
  6. 6सात कडिपत्ता पाने
  7. 2तमालपत्र पाने
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनहिंग
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 2 टेबलस्पूनतूप
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1/2 टीस्पूनराई
  14. 1 टीस्पूनलाल तिखट
  15. 2 टीस्पूनकोथिंबीर
  16. चवीनुसारमीठ
  17. आवश्यकतेनुसार पाणी
  18. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    दोन्ही डाळी स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यात घ्या.त्यात थोडीशी हळद हिंग मीठ आणि एक टीस्पून तुप घालून कुकरमध्ये चार पाच शिट्या काढुन घ्याव्यात..

  2. 2

    फोडणीसाठी साहित्य तयार करून घ्यावे..

  3. 3

    एका पॅनमध्ये तूप घालून त्यात लसणाचे बारीक तुकडे, जीरे राई, हिंग मिरचीचे तुकडे,तमाल पत्र घालून चांगले परतून घ्यावे व टाॅमेटो घालून मऊ होईपर्यंत परतावे.थोडी हळद, हिंग,लाल तिखट,किचन किंग मसाला घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतावे व शिजलेली डाळ घालून घ्यावी..

  4. 4

    डाळ चांगली पाच मिनिटे उकळून घ्यावी..व तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसणाचे बारीक तुकडे,सुकी लाल मिरची, हिंग घालून कडकडीत फोडणी करून डाळीवर घालावी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes