चविष्ट व्हेज तवा फ्राय.../ हिवाळी भाज्या (veg tawa fry recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#veg_tawa_फ्राय
हिवाळी भाज्यांची मस्त अशी डिश बनवली आज...😊😊वेगवेगळ्या कलरफुल भाज्या खायला आणि चवीला , दिसायला आणि त्याच्ये गुणधर्म ही खूप भारी असतात...अशीच एक चवदार रेसिपी मी केलेली आहे...

चविष्ट व्हेज तवा फ्राय.../ हिवाळी भाज्या (veg tawa fry recipe in marathi)

#veg_tawa_फ्राय
हिवाळी भाज्यांची मस्त अशी डिश बनवली आज...😊😊वेगवेगळ्या कलरफुल भाज्या खायला आणि चवीला , दिसायला आणि त्याच्ये गुणधर्म ही खूप भारी असतात...अशीच एक चवदार रेसिपी मी केलेली आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिन
४ लोक
  1. 2बटाटे
  2. 1 कपफ्लॉवर
  3. 1 कपब्रोकोली
  4. 1 कपफ्लॉवर
  5. 1 कपचिरलेले गजर
  6. 1/2 कपपिवळी शिमला मिरची
  7. 7-8बीन्स च्या शेंगा
  8. 1कांदा
  9. 1टोमॅटो
  10. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  11. 2-3तमालपत्र
  12. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  13. 1 टीस्पूनजीरे
  14. काश्मिरी चिली पावडर, हळद, चाटमसाला, गरम मसाला, मीठ चवीनुसार
  15. तेल तळण्यासाठी
  16. 2 टीस्पूनबटर

कुकिंग सूचना

४५ मिन
  1. 1

    प्रथम भाज्या धुवून चिरुन घ्याव्यात..

  2. 2

    आता या भाज्या तेलात तळून घ्याव्यात..

  3. 3

    एकीकडे कांदा बारीक चिरून, टोमॅटो, आले लसूण पेस्ट याची पेस्ट करून घेणे

  4. 4

    आता तव्यावर थोड तेल आणि बटर घालून त्यात तमाल पात्र, जीरे आणि कसुरी मेथी घालून थोड परतावं..मग बारीक चिरलेला कांदा परतून त्यात टोमॅटो, आले,लसूण पेस्ट घालून चांगले परतावे..आता यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून वाफ काढावी...

  5. 5

    आता या मिश्रणात सगळ्या भाज्या घालून छान परतून घेणे..यावर मीठ आणि चाट मसाला घालून मस्त परतून चांगली वाफ काढणे..आणि गरमगरम खायला घेणे..अतिशय चविष्ट होते ही तवा फ्राय..😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes