मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#अंगारकी_चतुर्थी #माझा_बाप्पा🙏#माझा_नैवेद्य_मोतीचूर_लाडू
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ गणपती बाप्पा गुणाधीश सर्व गुणांचा ईश आहे,सिद्धी, बुद्धीची देवता आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी व्रतांमध्ये सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीस अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. याला अंगारिका किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी असेही म्हणण्याचा प्रघात आहे. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. श्री गणपतीचे पृथ्वीमाणेच मंगळावरसुद्धा आधिपत्य आहे. श्री गणपती आणि मंगळ यांचा रंगही एकच आहे. अंगारकीला गणेशाची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात, तसेच मंगळाकडून येणारी गणेश स्पंदनेही पृथ्वीवर येतात. यामुळे चंद्राकडून येणार्‍या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात; म्हणूनच अंगारिका विनायकी आणि अंगारिका संकष्टी यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी अन् संकष्टी यांच्याइतके आहे.
ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे *२१संकष्टी* केल्याची फलप्राप्ती होते असे वेदवचन आहे.
आज मी माझ्या लाडक्या बाप्पाला नैवेद्यासाठी पहिल्यांदाच मोतीचूर लाडू केले.. आणि बाप्पाच्या कृपेने अतिशय अप्रतिम झालेत लाडू..बोला *गणपती बाप्पा मोरया*

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

90 मिनीटे
10-12लाडू
  1. 1 कपचणाडाळ
  2. 1 कपसाखर +1/2कप पाणी
  3. 1 टीस्पूनवेलची पावडर
  4. 2चिमटी खाण्याचा रंग
  5. 3- 4 टेबलस्पून साजूक तूप
  6. 2 टेबलस्पूनतळलेले काजू
  7. पिस्ते सजावटीसाठी

कुकिंग सूचना

90 मिनीटे
  1. 1

    प्रथम दोन ते तीन वेळा चणा डाळ स्वच्छ धुऊन घ्या नंतर त्यामध्ये पाणी घालून चणाडाळ चार तास भिजवून झाकून ठेवा.

  2. 2

    नंतरच्या डाळीमधले पाणी निथळून काढण्यासाठी चणाडाळ एका चाळणीत किंवा गाळण्यात घालून निथळत ठेवा..

  3. 3

    चणाडाळीमधले पाणी संपूर्णपणे निथळले की मिक्सरच्या चटणी अटॅचमेंट मध्ये ही चणा डाळ थोडी थोडी घालून पल्स मोड वर ठेवून ऑन ऑफ करा. असे एकूण फक्त चार वेळा करा म्हणजे चणाडाळ रवाळ दळली जाईल.

  4. 4

    आता एका तव्यावर थोडे साजूक तूप घाला.. या रवाळ दळलेल्या चणाडाळीच्या पसरट पातळ टिक्या करा आणि त्या टिक्क्या मंद आचेवर ३ते ४ मिनिटे तव्यावर तूप टाकून दोन्ही बाजूने झाकण ठेवून भाजा.‌आपल्याला हलकेच भाजायच्या आहेत..crispy, सोनेरी होईपर्यंत भाजायच्या नाहीत.. अशाप्रकारे सगळ्या टिक्क्या करून तुपावर भाजून घ्या.

  5. 5

    आता या टिक्क्या थंड झाल्यावर तोडून घ्या आणि परत मिक्सरच्या चटणी अटॅचमेंट मध्ये घालून पल्स मोडवर फक्त चार वेळा फिरवा म्हणजे टिक्क्या रवाळ दळलेल्या जातील आणि मोतीचूर लाडवासारखी बारीक बुंदी तयार होईल..

  6. 6

    आता एका पसरट कढईत मध्ये साखर घालून अर्धा कप पाणी घालून साखरेचा एकतारी पाक करून घ्या,त्यात वेलची पूड आणि खायचा रंग देखील घाला आणि..गॅस बंद करा आता चणा डाळीचे दळलेले मिश्रण हळूहळू या पाकात सोडा, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  7. 7

    आतापर्यंत गॅस सुरू करा आणि मंद आचेवर लाडवा चे मिश्रण थोडे कोरडे होईपर्यंत म्हणजेच चार ते पाच मिनिटे भाजून घ्या.. आता वेलची पावडर काजूचे तळलेले तुकडे घालून एकदा मिक्स करा.. नंतर गॅस बंद करुन लाडवाचे मिश्रण झाकून ठेवा आणि पूर्ण थंड झाल्यावर लाडू वळावेत..पिस्त्याचे,काजूने सजवा..

  8. 8

    तयार झालेले मोतीचूर लाडू एका डिशमध्ये काढून गणपती बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवावा आणि सर्व्ह करावे..

  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (13)

Similar Recipes