पंचखाद्य लाडू (Panchkhadya Ladoo Recipe In Marathi)

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी माझी आई पंचखाद्य लाडू बनवायची. ते लाडू मी आज श्रीकृष्णाच्या प्रसादासाठी बनवत आहे.
पंचखाद्य लाडू (Panchkhadya Ladoo Recipe In Marathi)
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी माझी आई पंचखाद्य लाडू बनवायची. ते लाडू मी आज श्रीकृष्णाच्या प्रसादासाठी बनवत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका मोठ्या कढईत 2 मोठे चमचे तूप घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 25 बदाम मंद गॅसवर चांगले तळून घेतले. मग त्यात 25 काजू घालून ते सुद्धा चांगले सोनेरी रंगावर तळून घेतले.
- 2
मग त्याच कढईत 1मेजरिंग कप मखाणे घालून मंद गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत तुपावर भाजून घेतले.
- 3
नंतर त्याच तुपात 1.5 कप सुके खोबरे घालून ते सुद्धा मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटे भाजून घेतले. त्याच खोबऱ्या मध्ये 25 मनुका घालून चांगले भाजून घेतले. खोबरे चांगले तांबूस रंगावर भाजून घेतले. आणि हाताने चुरुन घेतले.
- 4
मग भाजून घेतलेले बदाम मिक्सरच्या भांड्यात घालून थोडा जाडसर वाटून घेतले. आणि एका बाउल मध्ये काढून घेतले. नंतर मिक्सरच्या भांड्यात काजू घालून ते सुद्धा बारीक वाटून घेतले. मखाणे सुद्धा मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेतले.
- 5
नंतर सुके खोबरे आणि मनुका सुद्धा मिक्सर मध्ये वाटून घेतले आणि सर्व साहित्य एकत्र करून घेतले.
- 6
मग एका कढईत 3/4 कप साखर घालून त्यात 1/2 कप पाणी घालून साखर चांगली विरघळवून घेतली. मग गॅस मंद करून एकतारी पाक करून घ्यायला साधारण 4 ते 5 मिनिटे लागतात.
- 7
एकतारी पाक तयार झल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून त्यात तयार करून घेतलेले मिश्रण घालून, त्यात 1/2 चमचा सुंठ पावडर घालून, मिश्रण चांगले मिक्स करून घेतले.
- 8
आणि थंड झाल्यावर त्याचे लाडू वळून घेतले. आता श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत आपले पंचखाद्य लाडू.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत. Mrs. Sayali S. Sawant. -
पोळीचा लाडू (policha laddu recipe in marathi)
#पोळीचा_लाडू ...रात्री केलेल्या 4 पोळ्या शील्लक रीहील्यात म्हणून आज नविन पद्धतीने पोळी लाडू बनवला ...माझी आई बनवायची पोळी बारीक हातानेच करून गूळ ,तूप टाकून लाडू बनवायची ..मी आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवला ...खूपच सूंदर लागतो आणी 2-3 दिवस टीकतो सूद्धा.... Varsha Deshpande -
बेसन चे लाडू (Besan Ladoo recipe in marathi)
#बेसनम्हटले की आई च समोर असते, आई एक मैत्रीण च होती आम्हा बहिणीची, मला वाटायचे माझ्या आई इतके सुंदर लाडू कुणीच करू शकत नाही ,आणि खरेच आहे मी कितीही मन लावून केले तरी आई च्य हातची सर येतच नाही कोणत्याही पदार्थाला.माझ्या मुलांना मी बनवलेले लाडू खूप आवडले , ते पण महणतात मला की तुझ्यासारखे कोणते ही पदार्थ कुणीच बनवू शकत नाही...😂🙏🌹 Maya Bawane Damai -
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week9 पझल मधील ड्रायफ्रूट शब्द.आज मी पौष्टिक असा व झटपट होणारा लाडू केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
सुंठ पिपरमुळाचे लाडू (sunthache ladoo recipe in marathi)
#लाडू मला आवडतात म्हणून आई नेहमी माझ्या साठी बनवताना. जास्त करून थंडी मध्ये हे लाडू खातात पण या कोरोना काळात, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच पावसाळ्यात सर्दी खोकला होऊ नये यासाठी हे लाडू खुपच गुणकारी आहेत.हे तिखट-गोड लाडू तुम्हा सर्वांना नक्की आवडतील.पण हा लाडू सकाळी नाश्ता आधी खायचा बर का.....dipal
-
पौष्टिक मखाना-ड्रायफ्रूट लाडू (Makhana Dry Fruit Ladoo Recipe In Marathi)
ही रेसिपी मी आईसाठी केली आहे.ही माझी 511 वी रेसिपी आहे.हा लाडू सर्वांसाठी उपयोगी आहे.खास करून डायबिटीस व वेटलाॅस साठी. Sujata Gengaje -
कुकर मधील रवा लाडू (Cooker Rava Ladoo Recipe In Marathi)
#CCRकूक विथ कुकर रेसिपी.आजचे रवा लाडू मी कुकर मध्ये केले आहे. कमी साहित्यात झटपट होणारे आणि न बिघडणारे, असे हे लाडू आहे. तुम्हीही नक्की करून पहा.तुळशीच्या लग्नासाठी खास हे लाडू आज मी केले आहे. Sujata Gengaje -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (Khajur Dry Fruits Ladoo Recipe In Marathi)
#KSखजूर ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी | ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी - साखर नाही, गूळ नाही. किड्स स्पेशल रेसिपी मध्ये आज मी दाखवत आहे.खजूर सुका मेवा लाडू हे सहसा दिवाळी, नवरात्री आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणासुदीत तयार केले जातात. Vandana Shelar -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडू आज गोकुळाष्टमी आज खूप पदार्थ करायच ठरले एक कृष्णा साठी फराळच केला म्हणा ना त्यात बनवले डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू खूप जणांना आवडतात. आवडणार का नाही ड्राय फ्रूट नी भरपूर उत्तम चवीला आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. चला करूया डिंकाचे लाडू. 😀 Veena Suki Bobhate -
आंब्याच्या रसातला शिरा (mango shira recipe in marathi)
#आई माझ्या आईला आंब्याच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात.त्यामुळे मदर्स डे निमित्त मी तिचा फेवरेट आंब्याच्या रसतला शिरा केला आहे . माझी आई पण हा खूप छान करते. आणि मी खूप लकी आहे की माझी ही ५० रेसिपी मी खास माझ्या आईसाठी सादर करते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
डिंक लाडू (dink ladoo recipe in martahi)
#GA4#week14#keyword_ladooही रेसिपी माझ्या सासूबाई(आईंकडून) मी पहिल्यांदाच विचारून केली आहे..😀 आणि हो वरील प्रमाणात ६०-६५ लाडू होतात Monali Garud-Bhoite -
राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
#fr #राजगिरालाडू बऱ्याच वेळेस उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याचे लाडू खाल्ले जातात पण डायबिटीस असलेल्या व्यक्ती ते खाऊ शकत नाही. त्यांनाही चालेल अशा पद्धतीचे राजगिरा लाडू कसे करायचे ते मी आता तुमच्या सोबत शेअर करत आहे. हे लाडू लहान मुले सुद्धा खूप आवडीने खाऊ शकतील. शिवाय यात आयर्न,कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असते.Smita Bhamre
-
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
बेसन लाडू (मायक्रोवेव्ह रेसिपी) (besan ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #लाडूबेसन लाडू बहुतेक सर्वांना खुप प्रिय असतात त्यामुळे घरात सतत केलें जातात. पण ते भाजण्यासाठी जी मेहनत लागते त्याला कंटाळून मग लाडू बाहेरून मागवले जातात. साहजिकच त्याची चव आपल्या आवडीप्रमाणे असतेच असे नाही. हे लाडू भाजताना तूप सुद्धा जास्त लागते त्यामुळे डाएट वर असलेल्या लोकांच्या खाण्यावर नियंत्रण येते. आमच्या घरी बेसन लाडू खूपच प्रिय आहेत त्यामुळे वरच्या वर घरी केले जातात. या वेळी पहिल्यांदाच मी नवीन घेतलेल्या माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये बेसन लाडू केले आणि खूपच छान झाले. माझे काम खूपच सोपे झाले. म्हणून ही रेसिपी आज शेअर करत आहे.Pradnya Purandare
-
उडीद डिंकाचे लाडू (Urid Dindakche Ladoo Recipe In Marathi)
#Eb4#w4हिवाळ्यातील सर्वात मुख्य आहारातून घेतला जाणारा हा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू घरोघरी तयार केले जातात आणि पौष्टिक असल्यामुळे हिवाळ्यात जास्त करून आहारातून घेतात. हिवाळा लागताच या लाडू ची आठवण येते लहानपणापासून सगळ्यांनी हे लाडू खाल्लेले असतात मला माझ्या नानीचा हातचे आणि आईच्या हातचे लाडु खूप आवडतात आमची नानी खूपच छान बनवून आम्हाला मोठा डबा भरून महिनाभर पुरेल इतके लाडू करून द्यायची मग आता आई सेम नानी सारखी लाडू बनवते मी ही आईला विचारूनच रेसिपी तयार केली कारण बऱ्याचदा कितीही प्रयत्न केला तरी माझी चव आईच्या हातची सारखी येत नाही कुठे ना कुठे काहीतरी कमी मला वाटते.आई उडदाची डाळ स्वच्छ धून पसरवून मग काढाईत शेकून मग पीठ तयार करते आणि इथे मी उडदाचे पीठ बाहेर रेडिमेड मिळत असल्यामुळे रेडीमेड आणते बहुतेक त्याचाही फरक पडत असणार मला आज ही माझ्या हातचे लाडू खायला आवडत नाही फक्त असे वाटते आईच्या हातचे हे लाडू खावेतरी प्रयत्न करत असते असाच एक प्रयत्न केला आहे रेसिपी तून नक्कीच बघा Chetana Bhojak -
बिन पाकाचे रवा लाडू (bina pakache rava ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हे कीवर्ड घेऊन मी आज रव्याचे पाक न करता लाडू केले आहेत. Ashwinee Vaidya -
वाटलेल्या हरभरा डाळीचे लाडू (watlelya harbhara daliche ladoo recipe in marathi)
वाटलेल्या हरभरा डाळीचे लाडू साखरेचा पाक टाकून करत आहे. गुलाब जामून केले होते. त्याचा पाक उरला. आता या पाकचे काय करावे याचा विचार करून नवीन प्रकारचे लाडू म्हणून वाटलेल्या डाळीचे लाडू करत आहे. माझी आई वाटलेल्या डाळीचे लाडू खूप छान करते. आईची रेसीपी करण्याचा मी प्रयत्न करत आहे. rucha dachewar -
कान्हा साठी पौष्टिक पंजिरी लाडू... (panjiri ladoo recipe in marathi)
#लाडू.....यामध्ये वापरलेले सर्व साहित्य खूप पौष्टिक आहे....मखाने आपण असे खात नाही सिड्स सुध्दा एरवी खाल्ले जात नाही. आरोग्यासाठी उत्तम असा थोडे स्वतः चे इनोव्हेशन करुन केलेला लाडू बघा आवडतोय का....💐🎉🌹🌹🌹 हाथी घोडा पालकी जय कन्हैयालाल की... 👏👏👏👏👏👏👏हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे... 🙏🙏🙏 Rupa tupe -
दाणेदार बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#md" दाणेदार बेसन लाडू " माझ्या आईच्या हातचे बनलेले सगळेच पदार्थ म्हणजे अहाहा...!!! म्हणण्याजोगे...👌👌 सारा जहाँ एक तरफ...और माँ का खाना एक तरफ....!!मी 18 वर्षाची असताना काही वर्षे नर्सिंग हॉस्टेल ला राहायचे, तेव्हा तर जेवताना अक्षरशः रडू यायचं... तेव्हा आईची जितकी आठवण काढलीय ना...जी त्या आधी कधीच काढली नसेल....!! कारण आईच्या हातचं जेवायची रोजची सवय... आणि इथे एकदम साऊथ पद्धधतीच ताट समोर आलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.... आणि मनात 'आई ग' अशी हाक मारली...!! जवळ जवळ 4 वर्ष तिथलं जेवण जेवून पार वैताग आला...आणि पासआऊट होऊन जेव्हा घरी आले, तेव्हा आईच्या हातचं जेवून मन परत एकदा तृप्त झालं...!! लग्न करून सासरी आले तेव्हा पण असंच.... पण गम्मत अशी की माझं माहेर आणि सासर हे फ़क्त 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने....आई ने माझ्या आवडीचं काही बनवलं की मी गुपचूप बऱ्याच वेळा आई कडे वळून मस्त आवडत्या पदार्थांवर ताव मारला आहे..😉 माझी आई गोडाचे पदार्थ, मोदक, खीर, माझे आवडते बेसन लाडू, मेथीचे लाडू बनवण्यात एकदम पटाईत...व्हेज नॉनव्हेज सगळेच पदार्थ भारी बनवते... आईपराठे, थेपला, पुरणपोळी, मोदक ही तर तिची खासियत...!! आणि आईच्या हातचं गोड्या वाटनाचं वरण नि भात म्हणजेसोने पे सुहागा...👌👌माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आता.... असो लवकरच आई कडे जेवायला जाईन म्हणते...😊😊 तर आज मी माझ्या आईची स्पेशालिटी असलेली दाणेदार बेसन लाडू ची रेसिपी केली आहे... रेसिपी बघा आणि माझी मेहनत पण...🤗 Shital Siddhesh Raut -
ड्रायफ्रुट लाडू (Dryfrut Ladoo Recipe In Marathi)
#लाडू #हे लाडू हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढते. तसेच लाडू बाळंतीण स्त्रियांना दूध येण्यास उपयोगी आहेत. Shama Mangale -
पौष्टिक मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
#nrr# नवरात्री स्पेशल रेसिपीतिसरा घटक मखाना- मखाना सुपर फूड आहे. मखाना मध्ये उत्कृष्ट पोषण मुल्ये आहेत. Antioxidants ,कॅल्शियम व प्रोटिन रीच असल्याने weight management मध्ये खूप फायदेशीर आहेत. मुलांसाठी अतिशय पौष्टिक मखाना लाडू आहेत.सुकामेवा चा वापर करून अजून पौष्टिकता वाढवता येते. Rashmi Joshi -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
अळीव जवस लाडू (aliv javas ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4Birthday Challenge-2कुक विथ ड्रायफ्रुटसथंडीसाठी पोष्टीक आणि चविष्ट लाडू...😋 Rajashri Deodhar -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर ड्रायफ्रूट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8खजूर बहुतांशी घरात असतोच.खजूर अतिशय पौष्टिक असा व आयुर्वेदाने नावाजलेला आहे.लोहाचे भरपूर प्रमाण असल्याने बलदायी आहे.खजूर वाळवून खारीक तयार होते.सुक्रोज व फ्रुक्टोज या शर्करा खजुरात आढळतात.उपासासाठी सर्वमान्य असा हा खजूर,त्यात शेंगदाणे,गूळ,काजू,बदाम असा सुकामेवा घालून केलेले लाडू हा उर्जेचा मोठाच स्त्रोत आहे.काजू,बदाम आणि शेंगदाणे हे भरपूर स्निग्धांश असणारे आणि प्रथिनयुक्त तर गूळही रुची वाढवणारा,उर्जा देणारा...मग या सगळ्यांचे मिश्रण हेतहान लाडू...भूक लाडू असे खजुराचे सुकामेवा घातलेले लाडू ....सगळ्यांना खूपच आवडतात.😋😋 Sushama Y. Kulkarni -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय! rucha dachewar -
-
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
#HVथंडीमध्ये बाजारात भाज्यांची पालेभाज्यांची रेलचेल खूप असते त्यामुळे खूप सार्या रेसिपीज अशा आहेत की ज्या थंडीमध्ये सहजपणे करू शकतो.जसं की व्हेज हंडी, पोपटी, उंधियो इत्यादी इत्यादी. पण थंडी म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते पौष्टिक लाडू. मुलांना ,घरातील वृद्धांना, मोठ्यांना सर्वांना आवश्यक असलेले हे पौष्टिक लाडू जवळजवळ प्रत्येक घरी बनतात. त्यात थोडाफार बदल असतो, कोणी उडदाच्या पिठाचे, कुणी गव्हाच्या पिठाचे,कोणी फक्त ड्रायफ्रूट्स व गूळ आणि साखर वापरून करतात. मी आज हे जे लाडूबनवलेत ते फक्त खजूर आणि ड्रायफ्रूट घालून केलेले आहेत. साखर नसल्यामुळे कोणीही ते खाऊ शकतो. Anushri Pai
More Recipes
टिप्पण्या