अळूची भाजी (अळूचं फदफदं) (aluchi bhaji recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

अळूची भाजी (अळूचं फदफदं) (aluchi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1जूडी भाजीचा अळू
  2. 5-6 काजू
  3. 1/4 वाटीशेंगदाणे
  4. 1/4 वाटीचण्याची डाळ
  5. 2 टेबलस्पूनचण्याचे पीठ
  6. 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनतिखट
  10. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  11. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  12. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम भाऊ स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा ह्यात आपण अळूचे देठ सुद्धा बारीक चिरून घेतले आहेत. चण्याची डाळ,काजू व शेंगदाणे एक तासभर भिजत घालून ठेवावे नंतर एका कुकरमध्ये तेल घेणे तेल तापल्यावर त्यात जीरे,मोहरी,हळद, हिंग घालून फोडणी करून घेणे नंतर त्यात अळू,शेंगदाणे,चणा डाळ व काजू घालून चांगले मिक्स करून घेणे

  2. 2

    भाजी चांगली पाच मिनिटं तेलावर परतून घेणे त्यानंतर त्यात दोन वाट्या पाणी घालून कुकरला 5 शिट्ट्या करून घेणे नंतर बेसन घेऊन बेसन मध्ये पाणी घालून बेसनाची पेस्ट करून घ्यावी

  3. 3

    कुकर थंड झाल्यावर कुकर चे झाकण काढून भाजी चमच्याच्या साह्याने घोठून घेणे व गॅसवर मध्यम आचेवर ठेवणे आता त्यात चिंचेचा कोळ व बेसनाची पेस्ट त्यात घालून घेणे चांगले मिक्स करून घेणे (बेसनाची पेस्ट घातल्यावर चमच्याने पाच मिनिटं ढवळत राहणे नाहीतर भाजीत गुठळ्या होऊ शकतात) नंतर त्यात तिखट, गोडा मसाला,गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून भाजीला छान पाच मिनिटे उकळी येऊ द्यावी

  4. 4

    गरम-गरम अळूचं फदफदं तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes