पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#KS8
# मुंबईची पावभाजी

पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

#KS8
# मुंबईची पावभाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 वाटीकोबी
  2. 1 वाटीवाटाणे
  3. 1 वाटीफ्लावर
  4. 2गाजर
  5. 2बटाटे
  6. 4शिमला मिर्च
  7. 1/2बीट
  8. ग्रेव्हीसाठी
  9. 5टोमॅटो
  10. 2कांदे
  11. 3-4 तुकडेबीटाचे
  12. 10-12लसूण पाकळ्या
  13. 2 इंचआल्याचे तुकडे
  14. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  15. 3 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  16. 1 टीस्पूनकाळ तिखट
  17. 3 टेबलस्पूनतेल
  18. चवीनुसारमीठ
  19. गरजेनुसार पाणी
  20. गार्निशिंगसाठी
  21. 1कांदा बारीक
  22. 1/2 वाटीकोथिंबीर बारीक चिरून
  23. 3-4 टेबलस्पूनअमूल बटर
  24. 1लिंबू कट करून
  25. 1पावाची लादी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या धुऊन छान बारीक कट करून घेणे. आता कट केलेल्या सर्व भाज्या कुकरच्या भांड्यात मध्ये घेउन थोडेसे पाणी टाकून कुकर मध्ये शिजवून घेणे.

  2. 2

    ग्रेव्ही करण्यासाठी कांदा,टोमॅटो,आले लसूण चिरून घेणे. चिरलेले कांदा,टोमॅटो आणि बीटाचे तुकडे आले-लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून छान बारीक प्युरी तयार करून घेणे(प्युरी करताना यामध्ये बीटाचे तुकडे ऍड केल्या मुळे प्युरी चा रंग छान लाल येतो)

  3. 3

    आता शिजविलेल्या भाज्यांमधील पाणी बाजूला काढून घेणे आणि सर्व भाज्या स्मॅश करून घेणे

  4. 4

    आता कढईमध्ये तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करून घ्या (तुम्ही तेलाऐवजी बटर सुद्धा वापरू शकता) तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तयार केलेली प्युरी ॲड करा दोन मिनिटे प्युरी परतून घ्या. आता त्यामध्ये लाल तिखट आणि काळा मसाला ऍड करून मिक्स करून घ्या आणि तेल सुटेपर्यंत प्युरी छान परतून घेणे

  5. 5

    आता यामध्ये पावभाजी मसाला ॲड करून मिक्स करुन घ्या थोडेसे पाणी ऍड करा आणि दहा मिनिट छान ग्रेवी परतून घ्या आता ग्रेव्हीचा रंगही छान लाल झालेला दिसेल

  6. 6

    आता यामध्ये स्मॅश केलेली भाजी ऍड करून घ्या छान मिक्स करून घ्या आता आपण पण शिजवताना बाजूला काढलेले पाणी ॲड करा सगळे नुसार मीठ घालून झाकण ठेवा अजून दहा मिनिटे भाजी पुन्हा वाफवून घ्या मस्त अशी पावभाजी तयार

  7. 7

    आता मध्यम आचेवर पॅन गरम करा. त्यावर ती बटर टाकून पाव छान भाजून घ्या गार्निशिंगसाठी कांदा,कोथिंबीर, लिंबू कट करून घ्या.

  8. 8

    आता तयार केलेली भाजी बटर,कांदा, कोथिंबीर टाकून पावासोबत सर्व्ह करा.मस्त अशी टेस्टी पाव भाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes