नारळी भात (narali bhaat recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#rbr
#श्रावण शेफ वीक 2 ..रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज
#महाराष्ट्रात रक्षाबंधन/नारळी पौर्णिमा या दिवशी घराघरात केला जाणारा पारंपारीक पदार्थ. अगदी कमी साहित्यात होणारा नी कमी वेळात होणारा एकदम छान पदार्थ सगळ्यांना आवडणारा.मी face book वर live केला.आता रेसिपी पण टाकतेय बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिटे
5/6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदूळ बासमती
  2. 2 कपपाणी
  3. 1 चिमूटमीठ
  4. 3 टेबलस्पूनतुप
  5. 1 कपसाखर
  6. 1 कपखवलेला नारळ
  7. 10-12बदाम
  8. 10-12काजू
  9. 10-12पिस्ता
  10. 14-15मनुका
  11. 1 टीस्पूनवेलचीपुड
  12. 15-16केसर काड्या
  13. 4अख्खी वेलची
  14. 4लवंगा
  15. 1 तुकडादालचीनी

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    खालीलप्रमाणे साहित्य एकत्र करा बदाम पिस्ता,काजू यांचे तुकडे करून घ्या.केसर 1टेबलस्पून दुधात भिजवून ठेवा.

  2. 2

    भातासाठी दोन कप पाणी उकळत ठेवा त्यात एक टीस्पून तुप नी चिमुटभर मीठ घाला पाणी उकळले कि तांदूळ धुवून घाला.8/10मिनीटात भात तयार होईल.आता पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ आणा.

  3. 3

    कढईत 1टेबलस्पून तुप घाला नी सर्व सुका मेवा परतून घ्या नि बाजूला ठेवा.आता त्यात आणखी दोन टेबलस्पून तुप घाला नी फोडणी ला लवंगा,दालचीनी,वेलची घाला फोडणी झाली कि त्यात खवलेला नारळ घाला नी पाच मिनिटे परता.नारळ परतून झाला कि सुका मेवा थोडा बाजूला गार्नीशिग साठी ठेऊन बाकी नारळात घाला.झालेला भात घाला,साखर घाला अलगत ढवळावे म्हणजे शिते तुटत नाही.आता त्यात केसर मिश्रीत दुध व वेलचीपुड घाला नि 10मिनिटे झाकण ठेवून शिजवा.

  4. 4

    अप्रतिम नारळी भात तयार आहे.नैवेद्य दाखवून खायला घ्या.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes